Sunday, June 7, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

तर आम्ही देखील त्यांच्या विरोधात आमचे उमेदवार उभे करू – प्रकाश शेंडगे

जालना:  मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील विधानसभा निवडणुकीत त्यांचे उमेदवार उभे करणार असतील तर आम्ही देखील त्यांच्या विरोधात आमचे उमेदवार उभे करू, अशा शब्दात इतर मागासवर्गीय समाजाचे नेते प्रकाश शेंडगे यांनी मनोज जरांगे पाटील यांना आव्हान दिले आहे. त्या दृष्टीने राज्यातील 199 विधानसभा मतदारसंघाचे सर्वेक्षण पूर्ण झाले असल्याचा दावाही त्यांनी केला.

 आता ते करीत आहेत आरक्षणाचे राजकारण 

 सरकारने मराठा समाजाला टिकणारे 10 टक्के आरक्षण दिले आहे. त्याची अंमलबजावणीही सुरू झाली आहे. मराठा समाजातील युवक त्याचा लाभ घेऊ लागले आहेत. आर्थिक मागास प्रवर्गाच्या 10 टक्के आरक्षणापैकी साडेआठ टक्के आरक्षणाचा लाभ मराठा विद्यार्थी घेत आहेत.  तरीही ओबीसी प्रवर्गातून आरक्षणाची मागणी करत आंदोलन करणारे जरांगे पाटील आता आरक्षणाचे राजकारण करीत आहेत, अशी टीका शेडगे यांनी केली. 

… तर आम्ही 80 टक्क्यांपर्यंत जाऊ 

 इतर मागासवर्ग प्रवर्गातून टिकणारे आरक्षण आणि सगेसोयऱ्याच्या  कायद्याची अंमलबजावणी या मागण्या मान्य न झाल्यास विधानसभा निवडणुकीत आपले उमेदवार उभे करण्याचा इशारा जरांगे पाटील यांनी दिला आहे. ओबीसी समाजाचे प्रमाणही तब्बल 60 टक्के आहे. दलित आणि मुस्लिम समाजाला बरोबर घेतले तर ते प्रमाण 80 टक्के वर जाऊ शकते. जरांगे पाटील त्यांचे उमेदवार रिंगणात उतरवणार असतील तर आमचेही उमेदवार रिंगणात उतरतील. त्या दृष्टीने सर्वेक्षण आम्ही पार पाडले आहे, असे शेडगे म्हणाले. 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading