Sunday, June 7, 2026
Latest NewsSports

विनय कोंडमुरी बनला पुणे शहराचा तिसरा राष्ट्रीय रेफ्री

 

पुणे : विनय नागेश कोंडमुरी पुणे शहरातील तिसरा राष्ट्रीय रेफ्री बनला आहे. पूना डिस्ट्रिक्ट फुटबॉल असोसिएशनसाठी ही अभिमानास्पद कामगिरी ठरली आहे.

अखिल भारतीय फुटबॉल असोसिएशनने (एआयएमएफ) ही परीक्षा आयोजित केली गेली होती. विनयपूर्वी त्याचा मित्र किशोर चौधरीने रेफ्री परिक्षेत प्राविण्य मिळवले होते. पुण्यातील तो पहिला रेफ्री आहे. त्यानंतर 2023 मध्ये निखिल नायरने (असिस्टंट) रेफ्रीची परीक्षा दिली होती.

वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनने (विफा) रेफ्री परीक्षेसाठी नामांकन केलेल्या चार उमेदवारांपैकी विनय एक आहे. सर्वांनी लेव्हल पाचमध्ये सुयश मिळवले.

रेफ्री परीक्षा उत्तीर्ण विनयने भारताचा बॅज मिळवला आहे (वास्तविक पाहता त्याच्या रेफ्री जर्सीवर एआयएफएफ बॅज असेल).

असा बॅज मिळवणारा तो पीडीएफएचा एकमेव उमेदवार आहे.

या परीक्षेत फिटनेस, थिअरी, प्रॅक्टिकल आणि व्हिवा. एकूण चार परीक्षांचा समावेश होता

विनयने यावर्षी संतोष ट्रॉफीमध्येही महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले होतेे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading