एनसीईआरटीची नवीन पुस्तके विशिष्ट राजकीय विचारसरणीचा पुरस्कार करणारी
मुंबई: राष्ट्रीय शिक्षण संशोधन व प्रशिक्षण परिषदेने नव्याने प्रसिद्ध केलेल्या पाठ्यपुस्तकात विशिष्ट राजकीय विचारसरणीचा पुरस्कार केला असून अशा पुस्तकात करण्यात आलेला आपला नामोल्लेख त्वरित काढून टाकण्यात यावा. ही सर्व पुस्तके बाजारपेठेतून मागे घेण्यात यावी, अन्यथा आपण न्यायालयात परिषदेविरोधात खटला दाखल करू, असा इशारा राजकीय विश्लेषक योगेंद्र यादव आणि सुहास पळशीकर यांनी दिला आहे.
योगेंद्र यादव आणि सुहास पळशीकर हे एनसीईआरटीचे राज्यशास्त्राच्या पाठ्यपुस्तकांसाठी प्रमुख सल्लागार आहेत. मात्र, त्यांनीच नव्याने प्रसिद्ध केलेली राज्यशास्त्राची पाठ्यपुस्तके विशिष्ट राजकीय हेतूने प्रेरित असल्याचा आरोप केला आहे. या पाठ्यपुस्तकांमध्ये अर्थातच मुख्य सल्लागार म्हणून या दोन्ही राजकीय विश्लेषकांचा नामोल्लेख करण्यात आला आहे. हा नमुलेख आपल्या सहमतीशिवाय करण्यात आल्याचा आक्षेप या दोघांनीही घेतला आहे. अमोल एक काढून टाकावा आणि वितरित करण्यात आलेली पुस्तके बाजारपेठेतून परत घेण्यात यावी, अशी मागणी या दोघांनी एनसीईआरटी कडे पत्राद्वारे केली आहे.
एनसीईआरटीची ही पुस्तके विशिष्ट राजकीय विचारसरणीचा पुरस्कार करणारी आहेत. हा प्रकार शैक्षणिकदृष्ट्या अत्यंत अयोग्य आहे. आमच्या नावाआड दडून एनसीईआरटीने विद्यार्थ्यांच्या मनात विशिष्ट राजकीय विचारसरणी पेरण्याचा प्रकार करू नये, अन्यथा आम्हाला न्यायालयात दाद मागावी लागेल, असा इशारा पत्रात देण्यात आला आहे.
