शेतकऱ्यांना लुटणाऱ्यांवर मोक्का अंतर्गत कारवाई करा – छत्रपती संभाजीराजे
वाढीव किंमतीने खते आणि बोगस बी बियाने विक्रेत्यांवर तात्काळ कारवाई करा
पुणे : स्वराज्य पक्षाकडून वाढीव दराने खते विकणार्यांविरोधात स्टिंग ऑपरेशन करण्यात आले. यानंतर स्वराज्यप्रमुख छत्रपती संभाजीराजे यांनी पत्रकार परिषद घेवून सविस्तरपणे भूमिका मांडली.
- वाढीव दराने खते व बियाणे विकणार्या विक्रेते, डीलर व सहभागी अधिकाऱ्यांवर मोक्का अंतर्गत कारवाई करावी.
- काही ठिकाणी खतांचा तुटवडा निर्माण करून कृत्रिम टंचाई देखील केली जाते अशी माहिती देखील आम्हाला मिळाली.
- या पार्श्वभूमीवर आमच्या पक्षाचे सरचिटणीस डॉ.धनंजय जाधव व त्यांच्या काही सहकाऱ्यांनी पुणे शहरात मार्केट यार्ड परिसरातील खत विक्री दुकानांमध्ये जाऊन युरिया खरेदी केला. ₹२६६/- रुपयांना मिळणारी गोणी तब्बल ₹८००/- रुपयांना विकत असल्याची धक्कादायक बाब या घटनेतून आमच्या लक्षात आली आहे. या बाबत आमच्या पदाधिकाऱ्यांनी सदरील घटनेबाबत चे व्हिडिओ चित्रिकरण केलेले आहे. तसेच खरेदी केल्याचे बिल देखील मिळालेले आहे.
- ही घटना अतिशय धक्कादायक आहे. MRP पेक्षा जवळपास तिप्पट दराने विक्री होत असल्याची घटना अतिशय गंभीर आहे.
- सद्य स्थितीत राज्याला कृषी आयुक्त नाहीये हे अतिशय धक्कादायक बाब आहे.
- राज्यात अनेक भागांमध्ये शेतकऱ्यांची लूट, फसवणूक सुरू आहे. या बाबत राज्य सरकारने तातडीने कार्यवाही केली पाहिजे.
