पुण्यात ढगाफुटी; जनजीवन विस्कळीत
पुणे : पुण्यात आज जोरदार पावसाला सुरुवात होऊन ढगफुटी झाली. विक्रमी पावसाने वादळी वा-यासह लावलेल्या हजेरीमुळे पुण्यातील ३१ ठिकाणी झाड पडली आहेत. आज संध्याकाळी झालेल्या ढगफुटी सदृश्य झालेल्या पावसामुळे पुण्यात ३१ ठिकाणी झडपडीच्या घटना घडल्या आहेत.
दरम्यान, पावसामुळे अद्याप कोणतीही जीवितहानी झालेली नाही. पुण्यावर उंच ढगांची निर्मिती सुरू असून कमी वेळात अधिक पाऊस झाल्याने काही ठिकाणी फ्लॅशफ्लड सारखी स्थिती आहे. तसेच झाडे पडणे, भिंती पडणे, घरांमध्ये पाणी शिरणे आदी घटना शक्य असून पाणी ओसरेपर्यंत घराबाहेर पडू नये. पुण्यातील पावसाच्या स्थितीसंदर्भात आपण महापालिका अधिका-यांच्या संपर्कात असून आवश्यक तेथे आपत्कालीन यंत्रणा उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिलेल्या आहेत, असे पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ म्हणाले.
पुण्यात कोठे आणि किती पाऊस?
शिवाजीनगर एडब्लूएस : १०३
सदाशिव पेठ : ९३
कोथरुड : ९१
सिंहगड रोड : ७४
पाशाण : ६५
बावधन : ४८
बिबवेवाडी : ५६
खराडी : ३१
एनडीए : ४१
वाघोली : ४४
लोहगाव : १८.६ एमएम
कोठे कोठे झाडे पडली?
येरवडा, नागपुर चाळ
कोथरुड बस स्टैंड
सिहंगड रोड, दामोदर नगर
शिवाजीनगर, सावरकर भवन
सहकार नगर, तावरे कॉलनी
सेनापती बापट रोड
गणेश ंिखड रोड, ई स्क्वेअर
कोंढवा खुर्द, भैरवनाथ मंदिर
मार्केटयार्ड, संदेश नगर
कल्याणीनगर, गुरूनानक डेअरी
येरवडा, सैनिक नगर
नवी पेठ
सुखसागर नगर, आई माता मंदिर
पर्वती दर्शन
शुक्रवार पेठ, मामलेदार कचेरी
विमाननगर
रास्ता पेठ, दारुवाला पुल
एरंडवणा, महादेव मंदिर
पद्मावती, ट्रेझर पार्क
खडकी, रेंजहिल चौक
भवानी पेठ, रामोशी गेट
एरंडवणा, खिलारेवाडी
जंगली महाराज रोड
वाकडेवाडी, पीएमसी कॉलनी
कोथरुड, करिश्मा सोसायटी
कोथरुड, मयुर कॉलनी
येरवडा क्षेञिय कार्यालय
विमानतळाजवळ
लोहगाव, पवार वस्ती
धानोरी
गोखलेनगर
अतिप्रमाणात पाणी साचलेले परिसर
पाषाण, बी यु भंडारी शोरूम जवळ
सिहंगड रोड दोन ठिकाणी
सेंट्रल मॉल समोर
नारायण पेठ, अष्ठभुजा मंदिर जवळ
खडकी, गुरुव्दाराजवळ
एरंडवणा, गणेशनगर
राजेन्द्र नगर
कसबा पेठ, कुभांर वाडा
पहिलाच पाऊस ढगफुटी : पाटील
पुण्यातील पहिलाच पाऊस ढगफुटी झाली. पुण्यातील अनेक भागात पावसामुळे पाणी साचले आहे. अनेक ठिकाणी झाडपडीच्या घटना घडल्या आहेत. महापालिकेची सगळी यंत्रणा कामाला लागली आहे. या ढगफुटी सदृश्य परिस्थितीत प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत आपण काळजी करू नका. सगळ्या नुकसानाची नुकसानभरपाई केली जाणार आहे. पुण्यात ज्या ठिकाणी नुकसान झाल आहे हे कळेल मात्र नुकसान झाल्याची माहिती द्यायची असेल तर त्यांनी हेल्पलाईन नंबरवर संपर्क करावा, असे आवाहन मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले आहे
