Lok Sabha Election Results 2024 : सुप्रिया सुळे यांचा विजय; अजितदादांना धक्का
पुणे : लोकसभा निवडणुकीत राज्यातील बारामतीची लढत ही हाय व्होल्टेज होती. इथे विद्यमान खासदार आणि राष्ट्रवादी – शरदचंद्र पवार गटा तर्फे सुप्रिया सुळे यांनाच पुन्हा संधी देण्यात आली. तर त्यांच्यासमोर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना रिंगणात उतरवण्यात आले होते. पवार विरुद्ध पवार अशी ही लढत असल्याने राज्यासह देशाचे लक्ष या लढतीकडे लागले होते. आणि मंगळवारी लागलेल्या निकालानुसार अपेक्षेप्रमाणे पवारांनी हा गड राखला. अत्यंत प्रतिष्ठेच्या ठरलेल्या या लढतीत अखेर सुप्रिया सुळे यांनी बाजी मारली.
मंगळवारी सकाळी मतमोजणी सुरू झाली आणि फिर एक बार मोदी सरकार येण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या महायुतीचे सगळे अंदाज मतदारांनी फोल ठरवले. मविआच्या पारड्यात मतं टाकत राज्यात मतदारांनी मविआला भरघोस यश मिळवून दिले. मतमोजणी सुरू झाल्यापासूनच निकालाची धाकधूक होती. मात्र, सुरुवातीच्या काळातील आकडे हे महायुतीसाठी चिंताजनक तर मविआसाठी दिलासादायक होते. यावेळी राज्यात बारामती, शिरूर, पुणे, सातारा, कोल्हापूर अशा अनेक महत्त्वाच्या लढती होत्या. आणि यातील पुणे, सातारा वगळता अन्य जागांवर मविआला यश मिळाले आहे.
बारामतीची लोकसभा निवडणूक ही प्रामुख्याने विकास आणि भावनिकतेच्या मुद्द्यांवर जास्त लढली गेली. कुटुंबातीलच लढत असल्याने तिला जास्त महत्त्व होतेच पण अजित पवारांनी देखील आपली सगळी ताकद पणाला लावत या मतदासंघावर लक्ष केंद्रित केलं होतं. तर लेकीसाठी शरद पवार यांनी देखील वैयक्तिकरित्या या मतदारसंघात लक्ष घालत 8 सभा घेतल्या. याचाच परिणाम म्हणून बारामतीत सुप्रिया सुळे विजयी झाल्या असल्या तरी नणंद – भावजयीतील ही लढत अटीतटीची झाली
