Saturday, June 6, 2026
Latest NewsPUNE

पुणेकरांनी अनुभवली हिंदी – मराठी गाण्यांची सुरेल मैफल  

पुणे : सौ. जंयती पिल्ले आयोजित शिरीष कुमार म्युझिकल इव्हेंट क्लबचा हिंदी – मराठी बहारदार गीतांचा कार्यक्रम नुकताच महात्मा फुले सांस्कृतिक भवन, वानवडी येथे पार पडला. यावेळी हिंदी – मराठी गाण्यांची सुरेल मैफल पुणेकरांनी अनुभवली.

‘बंबई से आया मेरा दोस्त …. , इंम्तीहा हो गई इंतजार की .., इक प्यार का नगमा है …. अशा अजरामर हिंदी गाण्यांसह तुम्हांवर केली मी मर्जी बहाल … , हे मना आज कोणी… , अशी मंत्रमुग्ध करणारी मराठी गाणी देखील यावेळी सादर करण्यात आली. गायक शिरीष माळवदे, निवेदक अमित दोडके, अतुल पाटोळे, अनिल भुकन, गायिका मनीषा शिंदे, जंयती पिल्ले, अश्विनी वडके, भाविका साबणे, मनीषा गायकवाड, संध्या कुऱ्हाडे, शुभदा कोकीळ, विजय कुऱ्हाडे, पिनाक भिंगारे, हर्षद कांबळे, प्रवीण सोनी, मिमिक्री स्टार व गायक नितीन कुमार राणदिवे आदी कलाकारांनी आपल्या आवाजात एका पेक्षा एक सुरेल गाणी गाऊन रसिकाना मंत्रमुग्ध केले.

यावेळी नगरसेविका कालिंदी पुंडे व लक्ष प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेश पुंडे उपस्थित होते. यावेळी शिरीष कुमार म्युझिकल इव्हेंट क्लबच्या वतीने नगरसेविका कालिंदी पुंडे यांचा सत्कार करण्यात आला.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading