fbpx
Monday, June 17, 2024
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

Porsche Accident : महागडी पोर्श कार अल्पवयीन आरोपीला मिळाली होती बर्थडे गिफ्ट 

पुणे  : अल्पवयीन आरोपीने मद्यधुंद अवस्थेत महागडी पोर्श कार बेदरकारपणे चालवल्यामुळे संगणक अभियंता अनीश अवधिया आणि अश्विनी कोस्टा या दोन तरुणांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात आता नवी माहिती समोर आली आहे. सदर पोर्श कार अल्पवयीन आरोपीला आपल्याला आजोबांकडून वाढदिवसाची भेट म्हणून मिळाली होती. १७ वर्षीय आरोपीचे आजोबा सुरेंद्र अगरवाल यांनी दोन महिन्यांपूर्वी व्हॉट्सअपवर या कारचे फोटो शेअर केले होते. तसेच ही गाडी आपण नातवाला वाढदिवसाची भेट देत असल्याचे म्हटले होते. सुरेंद्र अगरवाल यांचे मित्र अमन वाधवा यांनी ही माहिती इंडिया टुडे टीव्हीशी बोलताना दिली.

सुरेंद्र अगरवाल यांना २८ मे पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. कल्याणी नगर अपघात प्रकरणात बांधकाम व्यावसायिक अगरवाल यांनी धमकावून डांबून ठेवल्याची तक्रार चालक गंगाधर पुजारी यांनी येरवडा पोलीस ठाण्यात दिली. त्यानंतर अल्पवयीन मुलाचे आजोबा सुरेंद्र अगरवाल यांना अटक करण्यात आली.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading