fbpx
Sunday, June 16, 2024
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

डोंबिवली स्फोटाने हादरली; 6 जणांचा मृत्यू

ठाणे : डोंबिवली एमआयडीसी फेज 2 मधील एका केमिकल कंपनीत भीषण स्फोट झाला असून या घटनेमध्ये तीन जणांचा मृत्यू झाला आहे. तर 22 जण जखमी झाले आहेत. तसेच अनेक जण या स्फोटात अडकले असल्याची भीती आहे. स्फोट इतका भीषण होता की स्फोटानंतर काही किलोमीटर अंतरापर्यंत कंपनं जाणवली. तसेच आजूबाजूच्या इमारतीच्या तसेच शोरूमच्या काचा  फुटल्या आहेत. तर धुराचे लोट कित्तेक किलोमीटर उच्च हवेत दिसत आहेत.  

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अंबर ऑरगॅनिक या केमिकल कंपनीत आज (दि.23) दुपारी भीषण स्फोट झाला. बॉयलरचा स्फोट झाल्याने ही घटना घडल्याचा प्रार्थमिक अंदाज आहे. घटना घडल्यानंतर स्फोटामुळे कारखान्याला आगीच्या ज्वाळांनी वेढून घेतले. यामध्ये 22 जण गंभीररीत्या होरपळले असून त्यांच्यावर एम्स आणि नेपच्यून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर सहा  जण दगावले आहेत. 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading