भांडवली अर्थव्यवस्थेतील प्रसारमाध्यम दलित, आदिवासींना न्याय मिळवून देवू शकत नाही
पुणे : आपल्याला भारत 2020 मध्ये महासत्ता होण्याचे स्वप्न दाखवले गेले अन् त्यासाठी जो निधी खर्च करण्यात आला त्यामध्ये सर्वाधिक मागासावर्गीयांच्या वाट्याला आलेला निधी वापरण्यात आला. आपल्याकडे अशी व्यवस्था आहे जिथे राजकारण्यांना दलीत विषय पाहिजे, दलीत मतं पाहिजेत पण दलीत व्यक्ती नको. त्यामुळे मागासावर्गीयांसाठी ध्येय्य धोरण ठरवण्याच्या प्रक्रियेत देखील मागासवर्गातील व्यक्ती आढळत नाही. शिवाय माध्यमांवर मक्तेदारी देखील याच राजकीय पक्षांची असल्याचे दिसते. त्यामुळे भांडवली अर्थव्यवस्थेतील प्रसारमाध्यम दलित, आदिवासी, महिला यांना न्याय मिळवून देवू शकत नाही, असे मत लंडन विद्यापीठातील विकास अभ्यास विभागात कार्यरत असणारे माध्यम अभ्यासक अभिषेक भोसले यांनी व्यक्त केले.
नालंदा बुद्ध विहार सम्यक उपासक संघाच्या वतीने व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये 51 वे व्याख्यान पुष्प अभिषेक भोसले यांच्या व्याख्यानाने गुंफन्यात आले. यावेळी भोसले यांचा सत्कार प्राध्यापक डॉ. किशोर पाटील व वनिता पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी माजी अतिरिक्त जिल्हाधिकारी पंजाबराव वानखडे तसेच मिलिंद वाकोडे, दीपक म्हस्के, सुधीर आगलावे, मिलिंद मोरे आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते युवा वर्गाची लक्षणीय उपस्थिती होती.
अभिषेक भोसले म्हणाले, ज्यांची माध्यमांवर मक्तेदारी त्याचमं वर्चस्व हे पूर्वी पासून चालत आले आहे. याचे आता राजकीय करण देखील झालेलेले आहे. काही दिवसांपूर्वी ‘न्यूज लॉनड्री’ या माध्यम संस्थेच्या वतीने एक सर्वे करण्यात आला. ज्यामध्ये कळाल की भारतात मुख्य प्रवाहात असलेल्या एका ही माध्यम संस्थेत दलीत संपादक नाही. किंवा जिथे धोरण ठरवली जातात तिथे एकही दलीत पत्रकार नाही. म्हणजे आपल्याकडे अशी व्यवस्था आहे की त्यांना दलीत विषय पाहिजे, दलीत मतं पाहिजेत पण दलीत व्यक्ती नको. महिलांच्या बाबतीत ही तसच आहे. फुले, शाहू, आंबेडकरांच्या महाराष्ट्रात अजून एकही महिला मुख्यमंत्री झालेली नाही.
पुढे बोलताना ते म्हणाले, ज्या प्रमाणे ‘सुपर पॉवर’ असते त्याप्रमाणे ‘सॉफ्ट पॉवर’ ही एक संकल्पना आहे. यामध्ये माध्यमांचा वाटा मोठा आणि महत्वाचा आहे. जगात भारतीय चित्रपट हा सांस्कृतिक प्रतिनिधीत्व करतो. तर जागतिक पातळीवरभगवान बुद्ध हे भारताचे आयकॉन आहेत. त्यामुळे भारतीय चित्रपट आणि बुद्ध हे जागतिक पातळीवर भारताचे प्रतिनिधीत्व करतात. चित्रपटातून जी सांस्कृतिक पेरणी केली जाते. ती करायला कित्तेक वर्ष जावी लागतात. त्यामुळे आगामी काळात युद्ध जर झाली तर ती ‘कल्चरल मार्केट’ भोवती असतील
रोहित आगळे यांनी सूत्रसंचालन केले. तर राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक अशोक धिवरे यांनी आभार मानले.
