४ शतकांपासून प्रलंबित रामजन्मभूमी वाद अखेर ‘स्वातंत्र्योत्तर भारताच्या न्यायव्यवस्थे’मुळेच् निकाली..!‘प्रजासत्ताक भारत’ उभारण्याचे श्रेय मोदीजी काँग्रेसला देणार का..?
काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांचा सवाल…!
पुणे : भाषणजीवी प्रधान सेवक नरेंद्र मोदीं, मुंबईच्या सभेत आपल्या १० वर्षांच्या विकासकामांवर भाष्य ही न करता, केवळ राममंदिराच्या यशाचे श्रेय घेण्याकडे झुकलेले दिसले. आणि ते ही “५०० वर्षांपासून प्रलंबित असलेल्या” (?) राम मंदिराच्या उभारणीचे श्रेय #श्रेयजीवी वारंवार घेत असल्याचे दिसले..! पण खरे वास्तव हे आहे की, ४। शतकांपासून प्रलंबित असलेला रामजन्मभूमीचा वाद अखेर स्वातंत्र्यानंतरच निकाली निघाला.. व तो देखील स्वतंत्र लोकशाही भारताच्या न्यायव्यवस्थेमुळे..हेच वास्तव सत्य आहे. स्वातंत्र्याचा खरा व वास्तव इतिहास लक्षात घेऊन ‘रामजन्मभूमी – वादाचा निर्णय’ हा स्वतंत्र भारताच्या न्यायव्यवस्थेमुळेच शक्य झाला… याच कारणामुळे ४ शतके प्रलंबित असलेल्या राम मंदिराच्या उभारणीचे श्रेय ‘स्वातंत्र्योत्तर लोकशाहीरुपी भारत’ उभारणाऱ्या काँग्रेसलाही मोदी देणार काय (?) असा सवाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी केला.
ते पुढे म्हणाले की, सुप्रीम कोर्टाच्या रामजन्मभूमी निर्णयाचे राजकीय श्रेय घेत, ५०० वर्षांचा प्रलंबित प्रश्न सोडवल्याचे मोदी सांगत आहेत.. व राम मंदिराच्या उभारणीचे #श्रेयजीवी वारंवार श्रेय घेत आहेत..! पण ते विसरले की ५०० वर्षांपैकी १७५ वर्षे भारत इंग्रजांच्या गुलामगिरीत आणि उरलेली २५० वर्षे राजेशाही / मुघलशाहीत विभागलेला होता..! भारताला इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त होण्याची जनतेची ईच्छा होती पण प्रत्यक्ष कृती होत नव्हती..! अखेर महात्मा गांधी, पंडित नेहरू, अब्दुल गफार खान, आझाद, बोस इत्यादींनी संघर्षरत राहून, स्वातंत्र्यलढ्याचे नेतृत्व केले तेव्हा ते अनेकवेळा तुरुंगात ही गेले. १९३२ ते १९४२ या सु १५ निर्णायक संघर्षाच्या काळात, भारत छोडो आंदोलनापासून १९४७ पर्यंत परकीय मालाची होळी, असहकार आंदोलन, सविनय कायदेभंग, मिठाचा सत्याग्रह इ. संघर्षांच्या बळावर देशव्यापी आंदोलन केले गेले..! इंग्रजांना जर्जर करून भारत सोडण्यास भाग पाडले..! तेव्हा भाजप किंवा आरएसएसचे कोण नेते कुठे होते..?
शहीद भगतसिंग, राजगुरू सह शेकडो हुतात्म्यांनी बलिदान दिले.. आणि १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत स्वतंत्र झाला. “राजेशाही आणि निजामशाही” मध्ये शेकडो वर्षे विभागलेला भारत “लोकशाही स्वातंत्र्योत्तर भारत देश” बनला व स्वतःची संविधानिक राज्यघटना बनवली गेली..’ न्याय व्यवस्था प्रस्थापित झाली..!
काँग्रेसचे प्रवक्ते गोपाळदादा तिवारी पुढे म्हणाले की, “लोकशाही रुपी स्वतंत्र प्रजासत्ताक भारताची” ऊभारणी काँग्रेसच्याच योगदानातून झाली आणि स्वातंत्र्योत्तर भारताच्या याच सु ६९ वर्षांच्या कार्यकाळात, ४३१ वर्षे प्रलंबित’ रामजन्मभूमी वादग्रस्त जागेवर ‘सर्वोच्च न्यायालयाने निर्णय देऊन ‘राम मंदिर ट्रस्ट’ स्थापन करण्याचा निर्णय व निर्देश दिले.
न्यायालयात रामजन्मभूमी वादाच्या खटल्यात मोदीजी किंवा भाजप कोणीही अर्जदार नव्हते किंवा ते याचिकाकर्तेही नव्हते.
तरीही १९८५ साली कोर्टातून किमान अवघीची सुट मिळताच तत्कालीन पंतप्रधान स्व राजीव गांधी यांनी त्याच दिवशी श्री राम मंदिराचा शिलान्यास (पाया भरणी) करून न्यायालयीन प्रक्रियेत एक पाऊल पुढे टाकले.. हे वास्तव ही मोदीजींनी ध्यानात घ्यायला हवे.. मात्र ते सोईस्करपणे त्यास बगल देतात.
त्यामुळे राममंदिर उभारणीच्या निर्णयाचे श्रेय फक्त सर्वोच्च न्यायालयाचे आहे ते मोदी किंवा भाजपचे बिल्कूल नाही..!
काँग्रेसचे प्रवक्ते गोपाळदादा तिवारी पुढे म्हणाले की, न्यायालयाच्या आदेशानंतर वादग्रस्त जागेवर मंदिर झालेले नाही ही वास्तवता देखील नाकारू शकत नाही.
१९९२ मध्ये काँग्रेसचे पंतप्रधान नरसिंह राव यांच्या कार्यकाळात राम मंदिराचा प्रश्न सामोपचाराने सोडवण्यासाठी अयोध्येत काही एकर जमीन संपादित करण्यात आली होती, ज्यावर आज मंदिर बांधले गेले आहे.
न्यायालयाच्या माध्यमातून तोडगा काढण्याच्या प्रयत्नात मध्यंतरी श्री श्री रविशंकर यांनीही मंदिराचा प्रश्न वाटाघाटीतून सोडवण्याचे प्रयत्न केले होते.. तेव्हाही हाच् पर्याय होता… मात्र तेव्हा हा निर्णय झाला नाही.
पण नंतर सर्वोच्च न्यायालयाने या सूचनेलाच् निर्णयाचे स्वरूप देऊन प्रकरण मिटवले आणि बाबरी मशीद ट्रस्टला मशीद बांधण्यासाठी ५ किंवा काही एकर जमीन देण्याचे आदेश दिले..! म्हणूनच मंदिराच्या उभारणीचे श्रेय श्रेयजीवी मोदीजीं नी घेऊ नये ते सर्वोच्च न्यायालयानेच केले आहे.
उलट, मंदिर ट्रस्टच्या कामात अयोग्यपणे हस्तक्षेप करून, त्यांनी भगवान श्री रामजींना “सीताजी, लक्ष्मणजी आणि हनुमानजी शिवाय”… शंकराचार्यांच्या मार्गदर्शना शिवाय, एकट्या ‘बालक-रामाची’ मूर्तीची प्रतिष्ठापना राम नवमी च्या मुहुर्ता शिवाय विना पत्नी शिवाय स्थापन करून असंख्य हिंदूंच्या भावनांशी खेळ केला आहे.
गोपाळदादा तिवारी पुढे म्हणाले की, अनेक हिंदूंच्या पौराणिक धर्म ग्रंथातुन “श्री कृष्णाचे बाललीला व बालपण ऐकले आहे मात्र प्रभू रामा च्या बाल-लीला ऐकल्या नाहीत.. तरीही मोदींनी एकट्या बालकरुपी रामाची मुर्तीची प्रतिष्ठापना इव्हेंट करण्यावरच भर दिला..! देशात सर्वत्र प्रभू श्री राम – लक्ष्मण पत्नी सिता व हनुमान सह रामाची मंदीरे आहेत.. तसेच १९५२ साली पंडीत नेहरुंचे काळात तसेच तत्कालीन पंतप्रधान स्व राजीव गांधींचे शिलान्यास काळात देखील वादग्रस्त राम जन्म भुमि जागेत वरील चार ही मुर्त्यांचे वास्तव्य होते.
भाजपने चालवलेल्या प्रचारावर भाष्य करताना गोपाळदादा तिवारी म्हणाले, प्रभू श्रीराम यांना अयोध्येत मोदी घेऊन आल्याचा हास्यास्पद प्रचार करत आहेत. तसा प्रयत्न करू नये. प्रभू श्री राम चिरंतर, आणि अखंड आहेत..! एकपत्नी – एकवचनी, मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्री राम हे सत्य आणि न्यायाचे अनुकरणीय उदाहरण होते, जे मोदी-शहा यांच्या शब्दकोशात दूर पर्यंत नसल्याची पुस्तीही त्यांनी जोडली..!
