Saturday, June 6, 2026
Latest NewsPUNETOP NEWS

भाजपाच्या जाहिरनाम्यात संविधानाची गॅरंटी नाही : डॉ. नितीन राऊत

पुणे : भाजपा व पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला विघातक वातावरणाकडे घेऊन जात आहेत. विरोधातील आवाज दाबले जात आहेत. एक प्रकारची हुकूमशाही देशात चालू आहे. भाजपाने अब की बार ४०० पार ही घोषणा देशाचे संविधान बदलण्यासाठीच दिली आहे. संविधान बदलण्यासाठी त्यांनी अनेकदा प्रयत्न केले आहेत. भाजपा एकीकडे सांगतात की संविधान बदलणार नाही व आरक्षण रद्द करणार नाहीपरंतू दुसर्‍या बाजूला मोदी सर्व प्रकारची गॅरंटी देत आहेतमात्र त्यांच्या जाहिरनाम्यात संविधानाची गॅरंटी नाही. त्यामुळेच त्यांचा डाव संविधान बदलण्याचा असल्याचा दिसत आहेअसे प्रतिपादन माजी मंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज कॉंग्रेस भवन येथे केले.

पुणे लोकसभा मतदार संघाचे महाविकास आघाडी व इंडिया आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांच्या निवडणुक प्रचाराकरिता डॉ. नितीन राऊत पुण्यात आले आहेत. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी प्रदेश प्रवक्ते गोपाळ तिवारीअनुसूचित जाती-जमातीचे शहराध्यक्ष सुजीत यादवगौतम वानखेडे, माध्यम समन्वयक राज अंबिके व अन्य उपस्थित होते.

यावेळी डॉ. राऊत म्हणाले कि यावेळी संपूर्ण देशात अंडर करंट दिसून येत आहे. उत्तर प्रदेश सहित अन्य राज्यांमध्ये ही स्थिती आहे. आतापर्यंत तीन टप्प्यांचे मतदान पार पडले आहे. यामधून भाजपा विरोधी वातावरण स्पष्टपणे जाणवत आहे. याची जाणीव झाल्यानेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मानसिकता बिघडलेली दिसत आहे. त्यांची वक्तव्ये पाहता त्यांना पराजित होण्याची मोठी चिंता दिसत आहे. पुण्यामध्ये देखील कॉंग्रेस तसेच महाविकास आघाडीच्या बाजूने वातावरण आहे. कॉंग्रेसने दिलेल्या उमेदवारात जनतेला आपला प्रतिनिधी दिसत आहेदूसर्‍या बाजूला उच्चभ्रू वर्गासाठी काम करणारा उमेदवार आहे. भाजपा व नरेंद्र मोदी विरोधात राग लोकांमध्ये दिसून येत आहे. लोक बोलताना दिसत नाहीमात्र मतदानातून हा राग बाहेर पडलेला दिसणार आहे.

डॉ. राऊत यांनी राज्य सरकार वर टिका करताना म्हटले कि एससीएसटी विद्यार्थ्यांना विदेशी विद्यापीठांमध्ये शिक्षणाकरिता दिल्या जाणार्‍या शिष्यवृत्तीसाठी उत्पन्नाची अट लावलीहा अतिशय चुकीचा निर्णय आहे. यामुळे बर्‍याच विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळणार नाही. राज्यातील शिंदे-फडणवीस-पवार सरकार दलित व मागासवर्गीयांचे आरक्षण संपुष्टात आणण्याचे कारस्थान करत आहेत. संविधानाला संपुष्टात आणण्याचे जाणीवपूर्वक प्रयत्न सुरू आहेत.

पुण्याचे वैभव निर्माण करण्यात कॉंग्रेसचे महत्वपूर्ण योगदान

आज जे विकसित पुणे शहर दिसत आहे. त्याच्या जडण-घडणीत तसेच पुण्याचे वैभव निर्माण करण्यात कॉंग्रेसचे महत्वपूर्ण योगदान आहे. कॉंग्रेस पक्षाच्या अनेक महत्वपूर्ण निर्णयांमुळे शहरात अनेक बदल घडले आहेत. अनेक संस्थाआईटी पार्क येथे आले आहेत. कॉंग्रेसकडे विकासाची दृष्टि असल्यानेच हे शक्य झाले आहे.

सोशल इंजीनियरिंगचा पुण्यात प्रयोग

कॉंग्रेस पक्षाने पुणे लोकसभा मतदार संघात उमेदवार देताना सगळ्या बाबींचा विचार केला आहे. पहिल्यांदा ओबीसी उमेदवार देऊन सोशल इंजीनियरिंगचा प्रयोग केला गेला आहे. सामान्य लोकांच्या प्रश्‍नावर पोटतिडकीने काम करणारा उमेदवार दिल्याने कॉंग्रेसला पुण्यामध्ये सर्व स्तरातून वाढता पाठिंबा मिळत आहे. पुणेकर मतदार अत्यंत सूज्ञ आहेत्यामुळे यावेळी योग्य निर्णय घेतील. फुले-शाहू-आंबेडकर विचारधारेवर चालणारे हे शहर आहे.

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading