Sunday, June 7, 2026
Latest NewsPUNE

कोथरूडमधील ३८ हजार मतदारांची नावे मतदार यादीतून गायब?  

पुणे : पुणे लोकसभा मतदार संघातील निवडूक अवघ्या काही दिवसांवर येवून ठेपली आहे. या पार्श्वभूमीवर येथील महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यालयामार्फत ‘व्होटिंग स्लिप’ देण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. यामध्ये कोथरूडमधील ३८ हजार मतदारांची नावे मतदार यादीतून गायब आल्याचे समोर आले आहे.  

मिळालेल्या माहितीनुसार, व्होटिंग स्लिपसाठी मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यालयात संपर्क साधणाऱ्या अनेक नागरिकांना आपले नाव मतदारयादीत नसल्याचे लक्षात येत आहे. गेल्यावेळेस मतदान केलेल्या कोथरूडमधील सुमारे ३८ हजार मतदारांची नावे यावेळेस वगळण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे. निवडणूक आयोगाने यादीतील नाव, छायाचित्र, पत्ता इत्यादींसंदर्भात सुधारणा करण्यासाठी वेळोवेळी केलेल्या आवाहनांकडे नागरिकांचे दुर्लक्ष झाल्याने त्यांना मतदानाचा हक्क गमवावा लागत आहे, अशी हळहळ राजकीय वर्तुळातून व्यक्त होते आहे. याविषयी निवडणूक आयोगाने एक संधी उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी नागरिकांकडून होते आहे.

मोहोळ यांचे प्रचार समन्वयक निलेश कोंढाळकर यांनी सांगितले की, निवडणूक आयोगाच्या डेटाबेसनुसार ऑनलाईन आणि ऑफलाईन व्होटिंग स्लिप मिळविण्यासाठी आम्ही महिनाभरापूर्वीच विशेष हेल्पलाईन सुरू केली. तसेच मतदारयादीतील नाव शोधण्यासाठी सर्व प्रचारसाहित्यावर क्यूआर कोड छापण्यात आला. पुण्यातील नागरिक मतदानासाठी उत्सुक असून आणि मतदार स्लिप मिळवण्यासाठी पाठपुरावा करत आहेत. हेल्पलाईनवर संपर्क करीत, कार्यालयात प्रत्यक्ष येऊन स्लिप घेऊन जाणाऱ्या नागरिकांचे प्रमाणही मोठे आहे. गेल्या ३० दिवसांत या यंत्रणेतून किमान दोन लाख नागरिकांनी स्लिप घेतल्या आहेत. यादरम्यान असेही काही मतदार आहेत ज्यांची नावे मतदार यादीतून वगळण्यात आली आहे. त्यांची संख्या जवळपास ३८ हजार इतकी आहे. याकडे निवडणूक आयोगाने लक्ष द्यावे व यांना मतदान करण्याची एक संधी द्यावी, अशी मागणी या नांगरिकांनी केली आहे.  

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading