Saturday, June 6, 2026
Latest NewsPUNE

राष्ट्र प्रगतीसाठी पुण्यात कालीचरण महाराजांच्या पौरोहित्याखाली सामुहिक महायाग

पुणे : हिंदू धर्माच्या पुर्नस्थापनेसाठी आणि राष्ट्राच्या सर्वतोपरी प्रगतीसाठी पुण्यात श्री सर्वेश्र्वरी कालिका अगस्तिश्र्वर निकुंभला महायाग समिती तर्फे श्री कालिका अगस्तिश्र्वर निकुंभला महायाग या सामूहिक महायागाचे आयोजन करण्यात आले आहे. अक्षय्य तृतीयेच्या निमित्ताने शुक्रवार, दिनांक १० मे रोजी सायंकाळी ५ वाजता एस. एम. जोशी पुलाखाली असलेल्या मुठा नदी पात्रातील मन:शांती दत्त मंदिरात हा याग होईल, अशी माहिती डॉ. प्रतिमा पासलकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पत्रकार परिषदेला निवृत्ती जाधव, आण्णा जगताप, राजश्री जोशी, सागर जंगम आदी उपस्थित होते. काली पुत्र कालीचरण महाराजांच्या पौरोहित्याखाली हा सामुहिक महायाग होणार आहे. भव्य अशा ९ बाय ९ फूट आकारातील हवनकुंडात एक हजार किलो समिधा आणि आठशे किलो शाकल्याचा वापर करण्यात येणार आहे. हवनासाठी १०० यजमानांची नोंदणी झाली असून तब्बल ३०० यजमान या यज्ञात सहभागी होणार आहेत. या यज्ञाद्वारे व्यक्तीला धर्म, अर्थ, काम, मोक्ष या चारी पुरुषार्थांची प्राप्ती होते.

निकुंभला हवनाचा उल्लेख आपल्याला रामायणात सापडतो. रावण पुत्र मेघनाद ने महासंग्रमाच्या वेळी प्रभू रामांवर विजय मिळावा, म्हणून हा हवन करण्याचा प्रयत्न केला होता. जो मारुतीरायाने विझवला आणि म्हणून आज आपण रामविजय साजरा करतोय. हवनात ३३ कोटी देव-देवतांचे आवाहन करण्यात येते. ज्या द्वारे यजमानांच्या आर्थिक प्रगतीच्या वाटा तर खुल्या होतातच पण यजमनांवरील कुठल्याही प्रकारचे तांत्रिक प्रयोग, बाह्य बाधा नष्ट होऊन लक्ष्मी बंधन मोकळे होते. तसेच सर्वतोपरी प्रगतीच्या वाटा मोकळ्या होतात. तसेच यजमानांचे परम कल्याण होते.

भव्य अशा ९ बाय ९ फूट आकारातील हवनकुंडात एक हजार किलो समिधा आणि आठशे किलो शाकल्याचा वापर करण्यात येणार आहे. हवनामध्ये विशिष्ट प्रकारच्या तांत्रिक उग्राहुती दिल्या जातात, ज्या द्वारे सर्व प्रकाच्या तांत्रिक बाधा तात्काळ नष्ट होतात. त्यामुळे अधिकाधिक भाविकांनी सहभागी होण्याचे आवाहन समितीने केले आहे. तसेच देशाच्या सर्वतोपरी प्रगतीसाठी आणि सर्व शत्रू राष्ट्राच्या नाशासाठी यात अती विशेष आणि अती गुप्त अशा तीव्र उग्राहुती दिल्या जाणार आहेत. अशा प्रकारचे उपक्रम यापुढे श्री सर्वेश्र्वरी समिती द्वारे वारंवार घेतले जाणार आहेत.

सर्व सामान्य हिंदूंच्या आध्यात्मिक, भौतिक प्रगतीसाठी आणि इहलोक व परलोक सुधारण्यासाठी या हवनाचे विशेष महत्त्व आहे. आपल्या हिंदू संस्कृतीत व्यक्तीने काय साधन केले असता त्याच्या उच्यतम ध्येयाची पूर्ती होईल, असे असंख्य उपाय सांगितले आहेत. पण आधुनिकतेच्या नावाखाली आपल्याला आपल्याच संस्कृतीचे विस्मरण झाले आहे, ती संस्कृती या हवना सारख्या उपक्रमाने पुन्हा एकदा सर्वश्रुत होईल. भगवान शंकराचे शिष्य महामुनी अगस्त्य ऋषी यांना आपल्या गुरुंकडून म्हणजे श्री शंकरांकडून या हवनाची दीक्षा मिळाली आणि श्री महाराजांना म्हणजे कालिपुत्र कालीचरण महराजांना आपल्या गुरूंकडून या हवनाचा कलियुगात अधिकार प्राप्त आहे, कारण कालिपुत्र कालीचरण महाराज हे महामुनिंचे प्रत्यक्ष मंत्र दीक्षित शिष्य आहेत.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading