भाजपला घरी बसवण्याची योग्य संधी – प्रकाश आंबेडकर
पुणे : देशभरातील मतदानाची घसरती टक्केवारी चिंतेचा विषय असून भाजपाने लोकांचा अपेक्षाभंग केल्याने मतदानाचे प्रमाण घसरत असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते अँड.प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे .त्यामुळे यावेळी भाजपा ला घरी बसवण्याची संधी आली असून मुस्लिम समाजाने ही संधी घालवू नये असे आवाहन त्यांनी केले .शिरूर लोकसभा मतदार संघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डॉ.अन्वर शेख यांच्या प्रचारासाठी आज हडपसर येथे जाहिर सभेचे आयोजन केले होते त्यावेळी ते बोलत होते . (Right opportunity to make BJP sit at home – Prakash Ambedkar)
पुढे ते म्हणाले की राज्यात भाजप ,काँग्रेस ,शिवसेना ,राष्ट्रवादी आणि इतर कोणत्याही पक्षाने मुस्लीम समाजाला उमेदवारी दिली नाही त्यावरून या पक्षाचा खरा चेहरा समाजाने ओळखावा तसेच वंचित बहुजन आघाडीने मुस्लिम समजाला उमेदवारी देऊन या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्याचे ठरवले आहे असे ही त्यानी स्पष्ठ केले .आज भाजपला हरवण्याची ताकत मुलीम समजाजात असून त्यांनी आता वंचित आघाडीच्या पाठीशी उभे राहण्याची भूमिका घेण्याचे आवाहन त्यांनी केले .
यावेळी मुस्लिम समाजाच्या वतीने प्रकाश आंबेडकर यांचा विशेष सत्कार करण्यात आला .
शिरूर लोकसभेचे उमेदवार डॉ.अन्वर शेख म्हणाले की ,आज मुस्लिम समाज अतिशय दुर्लक्षित आणि उपेक्षित झाला असून आता या समाजला फक्त वंचित बहुजन आघाडी आणि प्रकाश आंबेडकर न्याय देऊ शकतात त्यामुळे मी नोकरीचा राजीनामा देऊन वंचित आघाडीत सामिल झालो आहे असे ते म्हणाले .
या सभेस वंचित आघाडीचे अँड.अरविंद तायडे ,प्रदेश युवक नेते विशाल गवळी ,जिल्हाध्यक्ष राज कुमार ,विश्वास गदादे ,कमलेश ऊकिरंडे तसेच प्रदेश आणि पुणे शहर व जिल्हा प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते .या सभेला मोठ्या प्रमाणात महिला आणि युवक सहभागी झाले होते .
