उष्माघातात नागरिकांनी स्वतःचा बचाव करावा
- जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांचे आवाहन
परभणी : उष्णतेच्या लाटेमुळे शारीरिक ताण पडून मृत्यू होण्याची शक्यता आहे. उष्णतेच्या लाटेमुळे होणारे गंभीर परिणाम टाळण्यासाठी उष्माघातात नागरिकांनी स्वत:चा बचाव करण्यासाठी खालील उपाययोजना कराव्यात, असे आवाहन जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी केले आहे.
काय करावे :
1) उष्णतेच्या लाटेच्या माहितीसाठी रेडीओ, टि.व्ही. किंवा वर्तमानपत्रातील माहितीचा वापर करण्यात यावा.
2) तहान लागलेली नसली तरीसुध्दा जास्तीत जास्त पाणी पिण्यात यावे.
3) हलकी, पातळ व सूती कपडे वापरावेत. बाहेर जातांना गॉगल्स, छत्री, हॅट, बुट व चपलाचा वापर करण्यात
यावा. प्रवास करताना पाण्याची बाटली सोबत घ्यावी.
4) जर आपण बाहेर उन्हात काम करीत असाल तर हॅट किंवा छत्रीचा वापर करण्यात यावा. तसेच ओल्या कपड्यांनी डोके, मान, चेहरा झाकण्यात यावा.
5) शरीरात पाण्याचे प्रमाण कमी होत असल्याने ओ.आर.एस., घरी बनविण्यात आलेली लस्सी, तोरणी, लिंबू-पाणी, ताक इत्यादींचा वापर नियमित करण्यात यावा.
6) अशक्तपणा, स्थूळपणा, डोकेदुखी, सतत येणारा घाम इत्यादी उन्हाचा झटका बसण्याची चिन्हे ओळखावीत व चक्कर येत असल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घेण्यात यावा.
7) गुरांना छावणीत ठेवण्यात यावे. तसेच त्यांना पुरेसे पाणी पिण्यास देण्यात यावे.
8) घर थंड ठेवण्यासाठी पडदे, शटर व सनशेडचा वापर करण्यात यावा.
9) पंखे, ओले कपडे यांचा वापर करण्यात यावा. तसेच थंड पाण्याने वेळोवेळी स्नान करण्यात यावे.
10) कामाच्या ठिकाणी जवळच थंड पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात यावी.
11) सूर्य प्रकाशाचा थेट संबंध टाळणसाठी कामगारांना सुचित करण्यात यावे.
12) पहाटेच्या वेळी जास्तीत जास्त कामाचा निपटारा करण्यात यावा.
13) गरोदर महिला कामगार व आजारी कामगारांची अधिकची क
