Sunday, June 7, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

पाचव्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत ३९७ उमेदवारांचे ५१२ अर्ज दाखल

मुंबई  : राज्यातील लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या पाचव्या टप्प्यातील मतदान २० मे २०२४ रोजी होणार आहे. यासाठी राज्यातील १३ लोकसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस होता. आज सायंकाळी शेवटच्या दिवसापर्यंत एकूण 397 उमेदवारांचे 512 अर्ज दाखल झाले असल्याची माहिती, मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत देण्यात आली आहे.

पाचव्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या आजच्या शेवटच्या दिवसापर्यंत धुळे लोकसभा मतदारसंघात – 30 उमेदवारांचे 42 अर्ज, दिंडोरी – 20 उमेदवारांचे 29 अर्ज, नाशिक – 39 उमेदवारांचे 56 अर्ज, पालघर – 17 उमेदवारांचे 26 अर्ज, भिवंडी – 41 उमेदवारांचे 48 अर्ज, कल्याण – 34 उमेदवारांचे 45 अर्ज,  ठाणे – 36 उमेदवारांचे 43 अर्ज, मुंबई उत्तर – 25 उमेदवारांचे 32 अर्ज, मुंबई उत्तर पश्चिम – 29 उमेदवारांचे 33 अर्ज,  मुंबई उत्तर – पूर्व – 34 उमेदवारांचे 42 अर्ज,  मुंबई उत्तर – मध्य – 39 उमेदवारांचे 45 अर्ज, मुंबई दक्षिण – मध्य – 32 उमेदवारांचे 41 अर्ज, मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघात  21 उमेदवारांचे 30 अर्ज दाखल झाले आहेत.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading