Saturday, June 6, 2026
Latest NewsPUNE

महावितरण क्षेत्रातील ‌‘पवार पॅटर्न‌’ आदर्श ठरावा : डॉ. श्रीपाल सबनीस


पुणे : सद्य परिस्थितीत आदर्श राजकारण संपलेले आहे. राजकीय व्यवस्था नकारात्मकत्ोला पूरक आणि लोकशाहीला बळकटी न देणारी आहे. अशा नकारात्मक वातावरणात सकारात्मकत्ोने सेवाभाव, जिद्द, ध्यासाची भूमिका राजेंद्र पवार यांनी घेतली आहे. बेईमान काळात लोककल्याणार्थ विधायक कार्य करीत इमानदारीचे महत्त्व पटविणारे पवार हे कर्तव्यनिष्ठ अधिकारी आहेत, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केले. महावितरणच्या क्षेत्रात ध्येयासाठी जिद्दीने कार्यरत असणाऱ्या राजेंद्र पवार यांचा ‌‘पवार पॅटर्न‌’ आदर्श ठरावा, अशा सदिच्छाही त्यांनी व्यक्त केल्या.
आडकर फौंडेशनतर्फे यंदाच्या जिद्द जीवनगौरव पुरस्काराने महावितरणच्या पुणे परिमंडळाचे मुख्य अभियंता राजेंद्र पवार यांचा शुक्रवारी गौरव करण्यात आला. पुरस्काराचे वितरण डॉ. सबनीस यांच्या हस्ते झाले त्या वेळी ते बोलत होते. आडकर फौंडेशनचे अध्यक्ष ॲड. प्रमोद आडकर यांच्यासह ज्ञान फौंडेशनेचे अध्यक्ष मनोहर कोलते, महाराष्ट्र आर्थिक महामंडळाचे उपाध्यक्ष सचिन इटकर यांची प्रमुख उपस्थिती होती. 

सुरुवातीस प्रास्ताविकात ॲड. प्रमोद आडकर यांनी जिद्द जीवनगौरव पुरस्कारामागील भूमिका विशद करत जिद्द माणसाला शून्यातून उच्च ध्येयाकडे घेऊन जाते. अशीच वाटचाल पवार यांची असून त्यांच्या कार्याचा गौरव पुरस्कराच्या माध्यमातून करण्यात येत आहे, असे सांगितले.
चैतन्यदायी नेतृत्व कणाकणात बाळगत, सामाजिक बांधिलकी जपत कार्य करणारे निष्कलंक, निस्वार्थी, निरलस समाधानी सरकारी अधिकारी पवार होत, असे गौरवाने नमूद करून डॉ. सबनीस पुढे म्हणाले, अनेक समाजसेवी संस्थांना मदत करत पुण्याची पेरणी करणारे, उदारमतवादी भूमिका सांभाळणारे तसेच सामान्यातील असामान्यत्व ओळखणारे असे पवार यांचे व्यक्तीमत्त्व आहे. महावितरणसारख्या रुक्ष विभागात अधिकारी म्हणून कार्यरत असताना कर्मचाऱ्यांची क्रीडा, कला, सांस्कृतिक भूक भागविणारे, लोककल्याणार्थ सतत कार्यरत असणारे पवार संविधानात्मक संस्कृतीचे, तसेच राष्ट्रपुरुषांच्या चांगुलपणाची बेरीज आपल्या कार्यातून प्रवाही ठेवत आहेत.
महावितरणचा विकासात्मक आराखडा विशद करून सत्काराला उत्तर देताना राजेंद्र पवार म्हणाले, अनेक अडचणींवर मात करत अतिशय सकारात्मकत्ोने, पारदर्शकत्ोने, कर्मचाऱ्यांच्या साथीने मी माझी ध्येये व उद्दिष्ट्ये जिद्दीने पूर्ण करत आहे. या भूमिकेत्ूानच ग्राहकांना जास्तीत जास्त सुविधा देण्यासाठी मी बांधील आहे.
सचिन इटकर म्हणाले, महाराष्ट्राला चांगल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांची परंपरा लाभली आहे. विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सकारात्मक पद्धतीने कार्यरत असणाऱ्या पवार यांच्या यांच्यासारख्या अधिकाऱ्यांची आवश्यकता आहे. शासन जरी अनेक योजना जाहीर करत असले तरी या योजना प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रशासनाचा मोलाचा वाटा असतो. पवार यांच्यासारखे अधिकारी प्रशासनात आले तर राज्याचे प्रशासन उत्तम ठरत महाराष्ट्र देशाचे नेत्ृाव करेल.
राजेंद्र पवार हे सामाजिक बांधिलकी जपणारे अधिकारी असून कर्मचाऱ्यांसाठीही ते आदर्श ठरले आहेत, असे प्रतिपादन मनोहर कोलते यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि सन्मानपत्राचे वाचन शिल्पा देशपांडे यांनी केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading