Saturday, October 3, 2026
Latest NewsPUNE

इंदापुरमधून भरघोस मताधिक्य देऊ हर्षवर्धन पाटील यांनी अजित पवारांना दिला शब्द

पुणे : बारामती लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचारार्थ हर्षवर्धन पाटील यांच्या उपस्थितीत गुरूवारी इंदापुरात अजित पवार यांची जाहीर सभा पार पडली. यावेळी आमच्यात गेली ३० वर्षे राजकीय संघर्ष जरूर होता. परंतु आमच्यात व्यक्तिगत संघर्ष नव्हता. आता अजित पवार यांना बरोबर घेऊन राज्याचा विकास करू, अन् इंदापुरमधून भरघोस मताधिक्य देऊ असा शब्द काल हर्षवर्धन पाटील यांनी अजित पवारांना दिला.

इंदापुरात पार पडलेल्या मेळाव्यासाठी सुनेत्रा पवारांसह भाजपचे ज्येष्ठ नेते मारूतराव वणवे, अंकिता पाटील, निहार ठाकरे, भाजपचे तालुकाध्यक्ष शरद जामदार, विलासराव वाघमोडे, कृष्णाजी यादव, राजवर्धन पाटील, पांडुरंग शिंदे उपस्थित होते.

यावेळी ते म्हणाले की, आपला संघर्ष झाला पण राजकीय होता पण वैयक्तिक नव्हता. सुनेत्रा पवारांना खासदार म्हणून निवडून द्यायचं आहे. पण कार्यकर्त्यांचा मान सन्मान केला पाहिजे. दिलेला शब्द पाळण्याचा स्वभाव आमचा आहे, याचा अनुभव तुम्हाला आला असेल. दरवेळी आम्ही तुमचे काम करतो पण परत आमचे काय असा प्रश्न कार्यकर्ते यांच्या मनात होता. स्पष्ट भूमिका असली की अडचणी कमी होतात नसली तर अडचणी वाढतात. सुनेत्रा पवार खासदार असल्या पाहिजेत. असेही ते म्हणाले.

दरम्यान, इंदापुरात मेळावा पार पडल्यानंतर अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांच्यासह सहकुटुंबाने हर्षवर्धन पाटील यांच्या घरी भेट दिला. यावेळी पवार आणि पाटील कुटुंबीयांना स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला. या कौटुंबिक भेटीत, काय चर्चा झाली, याची चर्चा आता तालुक्यात रंगली आहे.

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading