Saturday, October 3, 2026
Latest NewsLIFESTYLE

तनाएराच्या कॉटन्स ऑफ इंडिया आणि समर ब्लूम्स कलेक्शनसोबत उन्हाळ्यातही मिळेल सुखद गारवा

बंगलोर: टाटांचा विश्वास आणि अस्सलतेप्रती बांधिलकी यांचा आनंद साजरा करत तनाएराने कॉटन्स ऑफ इंडिया आणि समर ब्लूम्स ही नवीन कलेक्शन्स सादर केली आहेत. यंदाच्या उन्हाळयात पारखी ग्राहकांसाठी तनाएराने आणलेली ही विशेष भेट नक्कीच सुखद गारवा निर्माण करेल. कॅटेगरी विस्तार आणि ग्राहककेंद्री दृष्टिकोन यावर भर देत २०२४ मध्ये तनाएरा ब्रँडने लक्षणीय यश संपादन केले आहे, हीच घोडदौड सुरु ठेवत तनाएरा भारतीय हातमाग परंपरेचे जतन करण्याचा वारसा पुढे नेत आहे. अतिशय अद्भुत आणि प्रेरणादायी अशी ही हॅन्डक्राफ़्टेड कलेक्शन्स प्रत्येक वीण आणि नक्षीमधून ब्रँडची मूल्ये दर्शवतात.

 

उन्हाळ्यातील सूर्याची सोनेरी आभा आसमंत उजळवून टाकत असताना, तनाएरा तुम्हाला कॉटन्स ऑफ इंडियाच्या सुखद गारव्याचा अनुभव घेत साड्यांच्या सुंदर जगाची सफर करण्यासाठी आमंत्रित करत आहे. भारतातील उत्कृष्ट विणकाम एकाच ठिकाणी उपलब्ध करवून देणारे कॉटन्स ऑफ इंडिया कलेक्शन भारतभूमी आणि येथील लोकांच्या कथांना जिवंत साकार करते. कोलकात्यातील गजबजाटापासून ते तेलंगणातील शांततेपर्यंत, तनाएराने देशात कानाकोपऱ्यांपर्यंत प्रवास करून भारतीय विणकारांशी संपर्क साधला. कॉटन्स ऑफ इंडिया कलेक्शन हा भारताच्या सांस्कृतिक कलांचा एक उत्सव आहे, जुन्या, नवीन आणि दुर्मिळ कलाकृतींचा समन्वय आहे जो आपल्या देशाच्या विणकाम वारशाचे सार दर्शवतो. अजरखची जटिल पण सुंदर कलात्मकता ते नारायणपेठची कालातीत अभिजातता आणि ओडिशा इकतच्या दोलायमान रंगछटांपर्यंत, तपशीलांकडे बारकाईने लक्ष देऊन तयार करण्यात आलेली यातील प्रत्येक साडी एक उत्कृष्ट नमुना आहे, ज्या कला परंपरेतून ती तयार करण्यात आली तिचे सार साडीमध्ये स्पष्टपणे दिसून येते.  या साड्यांच्या किमती १२९९ रुपयांपासून पुढे आहेत.

 

तनाएराचे समर ब्लूम्स कलेक्शन उन्हाळ्याचे बहरलेले सौंदर्य दर्शवते. यातील प्रत्येक साडी निसर्गामध्ये खुललेल्या रंगांपासून प्रेरणा घेऊन तयार करण्यात आली आहे. शानदार सिल्क कॉटन आणि चमकदार टसरपासून बनवलेले प्रत्येक विणकाम उन्हाळ्यात फुलणाऱ्या फुलांचा साज लेऊन साकार झाले आहे. नाजूक पाकळ्यांपासून ते उठावदार सौंदर्य असलेल्या फुलांपर्यंत विविध प्रकारची सजावट असलेल्या या साड्या चैतन्य पसरवतात. उन्हाळ्यातील फॅशनमध्ये भर घालत, तनाएराने तयार कुर्ते,  टॉप्स, ड्रेसेस, एथनिक स्कर्ट्स आणि प्री–ड्रेप केलेल्या साड्या देखील सादर केल्या आहेत. उन्हाळ्यातही अगदी सहजपणे स्टाईल करता यावी, आणि ती अतिशय आरामदायी असावी हा ब्रँडचा उद्देश आहे.

 

तनाएराचे सीईओ अंबुज नारायण यांनी सांगितले, “प्रामाणिकता आणि विश्वास यांच्या भक्कम पायावर उभारलेला आमचा ब्रँड तनाएरा फक्त एथनिक फॅशनपुरता मर्यादित नाही, याठिकाणी आम्ही अनुभव घडवतो, आमच्या ग्राहकांच्या अनोख्या आवडीनिवडी पूर्ण करतो. डिझाईनमधील वेगळेपण आणि नावीन्य हे आमचे आधारस्तंभ आहेत, सर्जनशीलतेच्या मर्यादा ओलांडून सातत्याने नवी प्रेरणा आणि नवी तंत्रे शोधून काढण्यावर आमचा भर असतो. प्रत्येक तनाएरा साडी एक मास्टरपीस बनावी हा आमचा उद्देश असतो. यंदाच्या वर्षात देखील आम्ही आमच्या बांधिलकीचे पुरेपूर पालन करत आहोत. समर ब्लूम्स कलेक्शनमधील नाजूक कारीगरी असो किंवा कॉटन्स ऑफ इंडियामधील परवडण्याजोग्या किमती असोत, आम्ही आमच्या ग्राहकांच्या अपेक्षांच्या वरचढ काम करतो, त्यांच्या पारखीपणाला, चोखंदळ वृत्तीला पुरेपूर वाव देतो.”

 

कॉटन्स ऑफ इंडियाच्या कालातीत सौंदर्यापासून ते समर ब्लूम्सच्या वैभवापर्यंत, तुमच्या वॉर्डरोबमध्ये स्टाईल, आत्मविश्वास आणि तुमची खास आवडनिवड यांना बहरू द्या. बोर्डरूमवर प्रभाव निर्माण करणारी बॉस असो किंवा मैत्रिणींसोबत ब्रन्च पार्टी असो किंवा शहरातील धावपळीतील प्रवास असो, तनाएराचे कलेक्शन तुमच्याकडे असेल तर या प्रत्येक ठिकाणी अगदी सहजसुंदर फॅशन करता येईल. फुलांच्या रंगांची मोहकता अनुभवा किंवा शानदार तरीही आरामदायी साड्या परिधान करून स्वतःचा प्रभाव निर्माण करा. तुमची आवडनिवड काहीही असो, तनाएरामध्ये ती नक्की पूर्ण होईल.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading