Monday, June 15, 2026
BusinessLatest News

पीजीआयएम इंडिया म्युच्युअल फंडातर्फे पीजीआयएम इंडिया रिटायरमेंट फंड

मुंबई :  वाढते आयुष्यमानआरोग्याचा वाढता खर्च आणि महागाईमुळे आयुष्याच्या सुरवातीलाच निवृत्तीपश्चात वयोमानासाठी आगाऊ बचत करणे गरजेचे झालेले आहे. त्यामुळे सेवानिवृत्तीनंतरच्या उद्दिष्टांसाठी शक्य तितक्या लवकर बचत आणि गुंतवणुकीला प्राधान्य देण्याचा सल्ला नेहमीच दिला जातो. बचत करण्याच्या काळात म्युच्युअल फंडांच्या माध्यमातून निवृत्तीसाठीच्या पर्यायाकरिता समभागांध्ये गुंतवणूक केल्याचे दोन लाभ आहेत. पहिला लाभ म्हणजे दीर्घ मुदतीत समभाग गुंतवणूकीआधारे महागाईवर मात करण्याचा संभाव्य लाभ मिळविणे आणि दुसरा लाभ म्हणजे फंड आधारित ‘निवृत्ती’ रुपी नियोजनातून आपली विशिष्ट उद्दीष्टे साध्य करणेज्याला गुंतवणूक तज्ज्ञ ‘मेंटल अकाऊंटींग’ असे संबोधतात.

पीजीआयएम इंडिया म्युच्यूअल फंडाने पीजीआयएम इंडिया रिटायरमेंट फंड ही मुदतमुक्त श्रेणीतील योजना गुंतवणूकदारांसाठी आणत असल्याची घोषणा आज केली आहे. या फंडासाठी गुंतवणूकीसाठी पाच वर्ष कालावधीची (लॉक-इन) अट आहे अथवा निवृत्तीच्या 60 वर्षापर्यंत गुंतवणूक केली जाणार आहे. यातील जी मुदत प्रथम पुर्ण होईल तोपर्यंत या योजनेत गुंतवणूक राहणार आहे.

गुंतवणूकदारांना सेवानिवृत्ती उद्दिष्टांच्या अनुषंगाने समभागसमभागाशी संबंधित पर्यायरिटस् (REITs) आणि इनव्हीट्स (InvITs) तसेच निश्चित उत्पन्न रोखे यांचा समावेश असलेल्या विविध साधनांत एकत्रितपणे गुंतवणूक करून भांडवल वृध्दी आणि उत्पन्न मिळवून देणेहे या फंडाचे उद्दिष्ट आहे.

निवृत्तीसाठीच्या नियोजनासाठी आगाऊ बचत आणि गुंतवणूकीचे महत्व स्पष्ट करताना पीजीआयएम इंडिया अॅसेट मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेडचे सीईओ अजित मेनन म्हणाले, “दीर्घ काळ जगणे ही निवृत्तीसाठी कमी जोखीम आहे आणि प्रत्येकजण पर्याय शोधण्यासाठी प्रयत्न करत असतो. घरशिक्षणकार यासारखी आपली जीवनातील बरीचशी उद्दिष्टे पारंपारिक कर्जाने पूर्ण होऊ शकतातपरंतु जेव्हा सेवानिवृत्तीचा विचार केला जातो तेव्हा आपण कर्जरुपी निधी उभारुन ही गरज पूर्ण करू शकत नाही. अशा प्रकारे आपल्या सेवानिवृत्तीपश्चात आयुष्यासाठी निधी उभारणीला प्राधान्य देणे प्रत्येकासाठी आवश्यक कर्तव्य आहे. उद्दीष्ट आधारित पध्दतीने गुंतवणूक नियोजनासाठी विश्वासार्ह आर्थिक सल्लागाराची मदत घेणे केव्हाही श्रेयस्कर आहे. सेवानिवृत्तीसाठी समर्पित केलेल्या फंडासाठी नियमित गुंतवणूक करत गेल्याने ध्येयाप्रती दीर्घकाळ वचनबद्ध राहण्यास आणि दीर्घकालीन चक्रवाढीचा फायदा मिळण्यास मदत होते.”

 

Asset Allocation Pattern of PGIM India Retirement Fund

“पुढील काही वर्षांत भारत सर्वात वेगाने वाढणारी G20 अर्थव्यवस्था बनणार असल्याचा अंदाज विविध जागतिक संस्थांनी व्यक्त केलेला आहे. दीर्घ कालावधीत कंपन्याची कमाई ही देशाच्या जीडीपीमधील वाढीचा मागोवा घेते असते तर समभागांच्या किमती कमाईतील वाढीचा मागोवा घेत असतात. उच्च वाढ दाखविणाऱ्या आणि चांगल्या दर्जाच्या लार्ज आणि मिड कॅप कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्याची सतत संधी आहे आणि या संधी भारताच्या वाढीचा फायदा घेऊ शकतात. अशा कंपन्या दीर्घ कालावधीत कार्यक्षम पद्धतीने आपल्या भांडवलात वेगाने चक्रवाढ सुरू ठेवू शकतात. अशा प्रकारे उच्च वाढ आणि चांगल्या दर्जाच्या समभागांचा वैविध्यपूर्ण पोर्टफोलिओ एक मजबूत सेवानिवृत्ती निधी तयार करण्यास मदत करू शकतो,” असा विश्वास पीजीआयएम इंडिया म्युच्युअल फंडाचे सीआयओ विनय पहारिया यांनी याप्रसंगी व्यक्त केला.

पीजीआयएमच्या या फंडात विविध क्षेत्र मिळून विविधांगी पोर्टफोलिओ तयार केला जाणार आहे. फंडातील किमान 25 टक्के रक्कम शेअरबाजारात अनुक्रमे लार्ज कॅप, मिडकॅप आणि स्मॉलकॅप समभागांमध्ये गुंतविली जाणार आहे. दीर्घकालीन वाढीची क्षमता आणि टिकाऊ व्यवसाय प्रारुप असलेल्या कंपन्यांनाच गुंतवणूकीसाठी प्राधान्य दिले जाणार आहे. पोर्टफोलिओची बांधणी करण्यासाठी शिखर ते तळ आणि तळ ते शिखर या पध्दती एकत्रित वापरल्या जाणार आहेत. त्यातून प्रत्येक समभागाचे मूलभूत घटक तसेच संबंधित कंपन्यांच्या व्यवस्थापनाचा दर्जा आणि त्या-त्या वेळी असलेले मुल्यांकन यांचाही यात विचार केला जाणार आहे.

उत्तम व्यवस्थापन आणि वृध्दीची उत्तम क्षमता असलेल्या कंपन्यांचा शोध तळ ते शिखर या गुंतवणूक पध्दतीत घेतला जाणार आहे, तर तळ ते शिखर या पध्दतीत ढोबळ आणि संकल्पना आधारित विश्लेषण हा दृष्टीकोन वापरला जाणार आहे. मूल्यांकनाचा बारकाईने विचार करत फंड व्यवस्थापक स्थिर अथवा उच्च वाढ दर्शविणाऱ्या कंपन्या गुंतवणूकीसाठी निवडणार आहेत. फंड व्यवस्थापक गुणात्मक आणि संख्यात्मक निकषांचाही विचार करणार आहेत. त्यात कंपनीला व्यवसायात असलेली संधी, कंपनीची ऐतिहासिक आणि सध्याची वित्तीय स्थिती, भांडवल नियोजनात कार्यक्षमता, सध्याचा रोख निधीचा खेळता प्रवाह, बाजारात लाभ उठविण्याची स्थिती, मुल्यांकनासाठीची चौकट, स्पर्धात्मक लाभ, ब्रॅण्डची स्थिती, व्यवस्थापनाची ताकद आणि कंपनीचा योग्य पध्दतीने कारभार आदी निकषांचा विचार केला जाणार आहे. नफ्याकडे झेपावणाऱ्या कंपन्यांमध्येही फंड व्यवस्थापक त्यांचा दृष्टीकोन ठरवत या फंडाचा निधी गुंतवू शकणार आहेत.

फंडाची समभागविषयक गुंतवणूक श्री. विनय पहारिया (Paharia), तर डेट, रिटस् आणि इनव्हीट्समधील गुंतवणूक श्री. पुनीत पाल हे सांभाळणार आहेत

 

फंडाबाबत माहिती

  • निर्गमन शूल्कः निरंक
  • गुंतवणूकीचा निश्चित कालावधीःपाच वर्ष अथवा निवृत्तीच्या वयापर्यंत (60 वर्ष) (यातील पहिली मुदत पुर्ण होईपर्यंत). (गुंतवणूकदार पाच वर्ष गुंतवणूकीची निर्धारित मुदत अथवा निवृत्ती वय यापैकी जी मुदत लवकर पुर्ण होईल या दोन मुदतींआधी पीजीआयएम इंडिया रियाटरमेंट फंडातून याच फंडाच्या अन्य योजनांमध्ये दाखल झाल्यास लॉक-इन मुदतीची अट तेथेही लागू राहणार आहे.  युनिटचे वितरण झाल्याच्या तारखेपासून पाच वर्षची लॉक-इन मुदत अथवा निवृत्तीचे 60 वर्ष यातील जी मुदत पहिल्यांदा पुर्ण होईल, या अटीला अनुसरूनच योजनेतून बाहेर पडण्यास परवानगी दिली जाणार आहे. अर्थात येथे निर्गमन शुल्क काही असल्यास लागू होणार आहे. )
  • प्रारंभीची खरेदी/स्विच-इनःकिमान पाच हजार रुपये आणि त्यानंतर एक रुपयांच्या पटीत.
  • अतिरिक्त खरेदीःकिमान एक हजार रुपये आणि त्यानंतर एक रुपयांच्या पटीत.
  • एसआयपीसाठीःकिमान पाच हप्ते आणि प्रति हप्ता किमान रक्कम- प्रत्येकी एक हजार रुपये आणि त्यानंतर एक रुपयांच्या पटीत.

फंड नियमित पुनर्विक्री आणि पुनर्खरेदीसाठी युनिटचे वितरण झाल्यापासून पाच दिवसांत खुला होणार आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading