विरोघी पक्षांच्या मार्गात काटे पेरणे’ मोदी-शहांच्या आसुरी शक्तीचे प्रतिक – काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी
पुणे : लोकशाहीत विरोघी पक्ष हा जनतेचा ‘दुसरा पर्याय’ आहे. मात्र पुन्हा सत्तेत येण्याच्या अपयशाच्या भितीमुळे सत्तेचा दुरुपयोग करीत, ऐन ‘निवडणुक काळात काँग्रेस सह विरोघी पक्षांच्या मार्गात काटे पेरण्याचे काम करणे – हे मोदी-शहांच्या आसुरी शक्तींचेच् प्रतिक’ असल्याची संतप्त टिका काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी केली..!
स्व-सत्तेच्या लालसेपोटी, ‘ऐन निवडणुक काळांत’ काँग्रेस पक्षाच्या बँकांची खाती गोठवुन, प्रतिस्पर्धी पक्षास नामोहरम करण्याचे निंद्य व कुटील प्रयत्न करणे, प्रति-पक्षाच्या प्रचार कार्यात अडथळे आणणे ही मोदी-शहांच्या ‘निवडणुक-रोखे निर्भर विकसीत भाजपची’ विकृती दर्शवते..!
संविधानिक लोकशाहीच्या संवर्धनासाठी, जनतेने ‘आसुरी शक्तीचा विनाश’ होलीकेच्या ज्वालेत करावा व देशास चौपट कर्जाच्या खाईतुन तारणारे, रोजगार देणारे, महागाई रोखणारे व सामाजिक सलोखा – शांतता प्रस्थापित करू शकणारे ‘काँग्रेस प्रणीत इंडीया आधाडी’ सरकार प्रस्थापित करण्यासाठी, आजच्या होळी’च्या दिवशी जनतेने कटीबध्द व्हावे, हीच ‘होळी निमित्त’ देशाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी शुभेच्छा व महाराष्ट्राच्या जनतेस विनंतीवजा आवाहन काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी केले..!!
