Saturday, June 6, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

बच्चू कडू महायुतीतून बाहेर पडणार?

अमरावती :  महायुतीच्या जागावाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही, अशात प्रहार जनशक्ती महायुतीत बाहेर पडणार असल्याची शक्यता वर्तवली जातेय. अमरावतीमधील लोकसभेच्या जागेवरून महायुतीत वाद निर्माण झाला आहे. प्रहार संघटना ६ एप्रिलला आपला उमेदवार घोषित करणार असल्याचे सांगितले जात आहे. या जागेवरून लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी नवनीत राणा इच्छुक आहेत.

अमरावतीच्या जागेसाठी महायुतीमध्ये कलह निर्माण झाला आहे. या जागेवरून खासदार नवनीत राणा यांना महायुतीकडून लोकसभेची निवडणूक लढायची आहे. तीच इच्छा प्रहार संघटनेचे प्रमुख बच्चू कडू यांनी व्यक्त केले. यामुळे मतदारसंघाचा तिढा सुटण्यापेक्षा आता वाढताना जास्त दिसतोय.

नवनीत राणा यांना कोणत्याही परिस्थितीत पाठिंबा देणार नाही, अशी भूमिका बच्चू कडू यांनी घेतली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रेमामुळे आता आम्ही अडचणीत येतोय, असे वाटतेय’’, असेही बच्चू कडू यांनी एका वाहिनीशी बोलताना सांगितले. आता थेट उमेदवार घोषित करणार आहे. बच्चू कडू यांच्या या भूमिकेमुळे महायुतीत फूट पडण्याची शक्यता आहे

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading