Maratha Reservation : हरामखोर बामणी कावा करतो; जरांगे पाटलांची फडणवीसांवर जहरी टीका
जालना : छत्रपतींशी शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सांगतो मी कोणत्याही पक्षाचा नाही, कोणत्याही पक्षाकडून मला मदत मिळत नाही. मराठ्यांना संपवण्याचा फडणवीसांचा डाव डाव आहे, असे म्हणंत अचानक मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील सभास्थळा वरून निघाले अन् मुंबईला जाण्यासाठी गाडीत बसले. ‘माझा बळी घ्यायचा असेल तर सलाईन मधून मला वीष कशाला देतो, मीच सागर बंगल्यावर येतो’, अशा आवेशात जरांगे पाटील मुंबईच्या दिशेने निघाले आहेत.
गाडीत बसल्यावर अनेक आंदोलकांकडून जरांगे पाटलांना उपचार घेण्याची विवावणी केली जात आहे. तसेच अशा अवस्थेत मुंबईला जावू नये म्हणून हजारो मराठा आंदोलक जरांगेच्या गाडी पुढे झोपले आहेत.
यावेळी माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, मला गोळ्या घातल्या तरी बेहत्तर पण मी मुंबईला जाणारच. मी सरकारच ऐकत नाही म्हणून फडणवीस आणि भुजाबळांचा मला संपवण्याचा डाव आहे. मराठ्यांचा दरारा कमी करण्यासाठी फडणवीसांचे हे काम आहे. यावेळी जरांगे यांचे डोळे भरून आले होते.
यावेळी टीका करताना मनोज जरांगे पाटील यांचा तोल घसरला, ‘फडणवीस हरामखोर बामणी कावा करतो, मराठ्यांचे वरचस्व कमी करण्यासाठी हा डाव करत आहे. राज्यात गृहामंत्र्यांच्या आदेशा शिवाय कोणतीही कारवाई होत नाही. आमच्या आंदोलनात त्यांच्याच आदेशावरून लाठीचार्ज करण्यात आला, नालायकाने बायांवर पण कारवाई केली.
