Monday, June 1, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

Maratha Reservation : सलाईनमधून मला विष देण्याचा, माझा बळी घेण्याचा फडणवीसांचा डाव – मनोज जरांगे पाटील 

अंतरवाली सराटी (जालना) : मला सलाईनमधून विष देण्याचा आणि माझा एन्काऊंटर करण्याचा फडणवीसांचा डाव होता, असा गंभीर आरोप मराठा नेते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर केले आहेत. माझा बळी घ्या पण खोटे आरोप करू नका, असे म्हणत जरांगे यांनी फडणवीसांना ‘तुम्हाला कायमचा आयुष्यातून उठवेन’, अशा शब्दात धमकी दिली आहे. 

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचं जालन्यातील आंतरवाली सराटीमध्ये आमरण उपोषण सुरुच आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून मनोज जरांगे पाटील यांच्या माजी सहकाऱ्यांकडून मराठा समाजाची दिशाभूल करत असल्याचा आरोप होत आहे. या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेवून आपली भूमिका स्पष्ट केली. 

सगेसोयऱ्यांची अंमलबाजवणी करुन घेणारच, असे स्पष्ट करत जरांगे पाटील म्हणाले, 23 डिसेंबर ते 25 फेब्रुवारीपर्यंत समितीने आजपर्यंत काय केलं? सरकारने फडणवीसांच्या सांगण्यावरून प्रमाणपत्र वाटप देखील बंद केलं. मराठ्यांचा दरारा कमी करण्यासाठी फडावीसांचा हा डाव आहे. या कटकारस्थानात मध्ये शिंदे आणि अजित पवार यांची काही माणसं आहे. आम्ही कुणबी मराठा म्हणून आरक्षण मागितले तर फडणवीस आम्हा मराठ्यांना 10 टक्क्यांवरच थांबावायला लागलाय. मी याविरोधात आवाज उठवतोय, तर फडणवीस यांनी माझा काटा काढण्याचा प्रयत्न केला आहे. त्याला माझा बळी घ्यायचा असेल तर मीच सागर बंगल्यावर योतो.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading