संत नामदेव अध्यासनाला ५ लाखाची देणगी
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संत नामदेव अध्यासनाला ५ लाखाची देणगी मिळाली आहे. निवृत्त बँक मॅनेजर श्री. भालचंद्र वासुदेव सातवळेकर, पुणे यांच्यावतीने ही देणगी देण्यात आली. यावेळी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.(डॉ.) सुरेश गोसावी, प्र-कुलगुरू प्रा.(डॉ.) पराग काळकर, प्रभारी कुलसचिव प्रा.(डॉ.) विजय खरे,वित्त व लेखा अधिकारी सीएमए चारूशिला गायके, व्यवस्थापन परिषद सदस्य श्री. रविंद्र शिंगणापूरकर, श्री. विजय सोनवणे, संत नामदेव अध्यासनाचे प्रमुख डॉ. ओमश्रीश श्रीदत्तोपासक, सिद्देश दिपक बोरकर उपस्थित होते. संत नामदेव अध्यासनात दरवर्षी ब्रम्हचैतन्य श्री गोंदवलेकर महाराज व्याख्यानमाला आयोजित करण्यात यावी, यासाठी ही देणगी दिल्याचे श्री. सातवळेकर यांनी यावेळी सांगितले. दरम्यान अध्यासनात सार्थ श्री. नामदेव गाथेच्या प्रकल्पावर काम सुरू असून याचा पहिला खंड पूर्ण झाला असल्याची माहिती अध्यासन प्रमुख डॉ. ओमश्रीश श्रीदत्तोपासक यांनी यावेळी दिली.
