गौतम हरी सिंघानिया यांनी अयोध्येतील रेमंड स्टोअरच्या भूमिपूजनापूर्वी राम मंदिरात जाऊन घेतले प्रभू श्रीरामांचे आशीर्वाद
अयोध्या : रेमंडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक गौतम हरी सिंघानिया यांनी रामपथ येथील नाहरबाग येथे ‘एथनिक्स बाय रेमंड‘ दालनाचे भूमीपूजन करण्यापूर्वी प्रभू रामाचे आशीर्वाद घेण्यासाठी सोमवारी राम मंदिराला भेट दिली.
“भारतीयांसाठी भारताचे कार्य पुढे नेण्यासाठी आज मी अयोध्येत परंपरा साजरी करत आहे. येथे रेमंड दालनाद्वारे आमच्या पहिल्या एथनिक्सच्या उद्घाटनासह आम्ही या नवीन अध्यायाची सुरुवात करत असताना आमच्या समृद्ध वारशातून योग्य गोष्टी करण्याचा रेमंडचा संकल्प मजबूत करण्यासाठी मी प्रभू रामाचे आशीर्वाद घेत आहे. आधुनिकतेच्या धाग्यामध्ये अखंडपणे पारंपरिकता विणणे हा यामागचा उद्देश आहे,” असे भूमिपूजनानंतर गौतम सिंघानिया म्हणाले. यावेळी बॉलीवूड, क्रीडा आणि गुंतवणूक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. डीलर्स आणि व्यापारी भागीदारही यावेळी होते.
सुरुवातीला गौतम सिंघानिया यांनी रेमंडच्या या आगामी कामगिरीसाठी राम मंदिरात आशीर्वाद मागितले. कालातीत वारसा आणि समकालीन नवकल्पना यांच्या मिलाफाचे प्रतीक म्हणून परंपरेची आधुनिकतेशी सांगड घालण्याच्या रेमंडच्या चिरस्थायी नीतिमूल्यांना सिंघानिया यांच्या उपस्थितीने अधोरेखित केले.
३१ डिसेंबर २०२३ पर्यंत एथनिक्स बाय रेमंडची संपूर्ण भारतात १०५ दालने आहेत. त्यातून रेमंडचे एकूण रिटेल नेटवर्क मजबूत होत असून त्यांची संख्या १,५१२ दालनांवर पोहोचली आहे.
राममंदिराची भेट ही भूमिपूजन सोहळ्याच्या शुभ कार्यासाठीची चांगली सुरुवात होती. रेमंड आणि श्री. सिंघानिया यांचे भारताच्या सांस्कृतिक जडणघडणीशी खोलवर रुजलेले संबंध यातून दिसून येतात.
