fbpx
Tuesday, June 25, 2024
Latest NewsMAHARASHTRAPUNE

लोकशाही बळकट करण्यात पीठासन अधिकारी यांची भूमिका महत्त्वाची – डॉ नीलम गोऱ्हे

मुंबई : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमात ‘८४ व्या अखिल भारतीय पीठासन अधिकारी परिषदे’ निमित्त विधान परिषदेच्या उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे.

८४ वी अखिल भारतीय पीठासीन अधिकारी परिषद आणि भारतातील राज्य विधिमंडळ सचिवालयांच्या सचिवांची ६० वी परिषद नुकतीच विधान भवन, मुंबई येथे झाली. संसदीय लोकशाहीत विधिमंडळ आणि कायदेमंडळांची भूमिका आणि लोकशाहीच्या प्रक्रियेत जनतेला न्याय देण्यासाठी पीठासीन अधिकारी यांची अतिशय महत्त्वाची भूमिका आहे. परिषदेत घेतलेले निर्णय पंचायतराज ते संसदेपर्यंत लोकशाही संस्थांना सक्षम करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरतात. मुंबईत झालेल्या या परिषदेत देशातील लोकशाही संस्थांना नवी दिशा देण्यासाठी अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले. या निर्णयाबाबत विधान परिषदेच्या उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे यांनी ‘दिलखुलास’ कार्यक्रमातून माहिती दिली आहे.

दिलखुलास कार्यक्रमात उपसभापती डॉ गोऱ्हे यांची मुलाखत मंगळवार दि. ६ आणि बुधवार दि. ७ फेब्रुवारी २०२४, रोजी आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल ॲपवर सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित होणार आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यावाणी कम्युनिटी रेडिओ केंद्रावर ही मुलाखत रेकॉर्ड करण्यात आली असून निवेदक श्रीदत्त गायकवाड यांनी ही मुलाखत घेतली आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading