Tuesday, June 16, 2026
Latest NewsPUNE

डॉ. वर्धमान कांकरिया यांनी भारतात पहिल्यांदाच यशस्वी केली  मोठ्या दृष्टीदोषावर नेत्र शस्त्रक्रिया

पुणे : इम्प्लांटेबल लेन्स आणि लेझर आय सर्जरी या दोन अत्याधुनिक शस्त्रक्रिया तंत्रांची सांगड घालून पुण्यातील आंतरराष्ट्रीय कीर्तीचे नेत्रतज्ज्ञ डॉ वर्धमान कांकरिया यांनी ३५ वर्षीय महिलेला पूर्ववत दृष्टी प्राप्त करून दिली. ही महिला मूळची बिहारची असून तिला लहानपणापासूनच अत्यंत तीव्र मायोपियाचा (निकटदृष्टीदोष – जाड चष्मा होता) त्रास होता.

या महिलेच्या दोन्ही डोळ्यांमध्ये तीव्र मायोपिया होता (२४ नंबरचा मोठा चष्मा) आणि तो बरा होण्याजोगा नाही, असे भारतातील बऱ्याच ठिकाणी तिला सांगण्यात आले. या महिलेचा डायप्टर चष्मा क्रमांक -२४ एवढा होता. पाच वर्षांची असल्यापासून ती जाड चष्मा वापरत होती. त्यातून तिला केवळ वाकड्या-तिकड्या प्रतिमा दिसत होत्या. डायोप्टर हे चष्मा क्रमांकाचे एकक आहे.  तिच्या अत्यंत जास्त असलेल्या चष्म्यावर दोन तंत्रज्ञानाच्या अनोख्या मिलाफातून उपचार करण्यात आले.

“या कॉम्बिनेशन सर्जरीला बायोप्टिक्स असे म्हणतात. यात आत्यंतिक तीव्र मायोपिया बरा करण्यासाठी दोन ऑप्टिकल शस्त्रक्रिया एकत्रित केल्या जातात. मी नावीन्यपूर्ण दीर्घकालीन इम्प्लांटेबल कॉन्टॅक्ट लेन्स (व्हिसियन इवो इम्प्लांट) आणि सर्वात प्रगत १०० टक्के ब्लेड-फ्री लेसर सर्जरी (टोपोगाइडेड फेम्टोलासिक) यांचा संयोग करून रुग्णाचा -२४ डायप्टरचा टोकाचा मायोपिया बरा केला,” असे नेत्रशल्यचिकित्सक डॉ. वर्धमान कांकरिया यांनी सांगितले.

दोन खास यूएस एफडीए तंत्रज्ञानाचे असे बायोप्टिक्स भारतात प्रथमच वापरले गेले आहेत.ते पुढे म्हणाले,  “ही केस निवड समितीद्वारे स्वीकारण्यात आली असून लवकरच ती आंतरराष्ट्रीय नियतकालिकात प्रसिद्ध केले जाईल.” या रुग्ण महिलेने दिल्ली, हैदराबाद आणि चेन्नई येथील अनेक नेत्रशल्यचिकित्सकांचा सल्ला घेतला होता. एवढ्या मोठ्या नंबरच्या चष्म्यावर उपचार करणे शक्य नसल्याचे सांगून त्यांनी तिला परत पाठवले होते.

“माझ्या किशोरवयीन काळात चष्म्याचा नंबर झपाट्याने वाढत गेला. वयाच्या २० व्या वर्षीपर्यंत मला निकटदृष्टीदोषाचा तीव्र त्रास होऊ लागला. मी घातलेल्या जाड चष्म्यातून मला फक्त विकृत प्रतिमा दिसत होत्या,”  असे तिने सांगितले. तिला कॉन्टॅक्ट लेन्स सहन होत नव्हत्या.

“तिच्या डोळ्यांमध्ये -२० डी नंबरवर उपचार करण्यासाठी सर्वात प्रगत आयसीएल बसविण्यात आले. यामुळे तिच्या डोळ्यांची शक्ती -२४ डायप्टरवरून -४ डायप्टरपर्यंत कमी झाली. आठवडाभर बरे झाल्यानंतर,  -४ डायऑप्टरचा दंडगोलासारखा चष्मा दुरुस्त करण्यासाठी कॉर्नियावर टोपोगाइडेड फेम्टोलासिक नावाचे सर्वात प्रगत कॉर्नियल लेसर केले गेले. ते कस्टमाईज्ड ब्लेडलेस लेसिक आहे,” असे डॉ. कांकरिया यांनी सांगितले.

कांकरिया यांच्या पुण्यातील एशियन आय हॉस्पिटलमध्ये ही शस्त्रक्रिया करण्यात आली.  दोन्ही शस्त्रक्रियांसाठी प्रत्येकी १० मिनिटे लागली आणि कोणत्याही अॅनेस्थेसिया इंजेक्शन किंवा पॅचची गरज न पडता वेदनारहित अशा त्या झाल्या. “आता मी चष्मा घालत नाही आणि कोणत्याही अडथळ्यावाचून माझी दृष्टी पूर्वीपेक्षा चांगली आहे,” असे या महिलेने सांगितले.

इंट्राओक्युलर इम्प्लांट अँड रिफ्रॅक्टिव्ह सोसायटी ऑफ इंडियाच्या शैक्षणिक संशोधन समितीचे अध्यक्ष नेत्रशल्यचिकित्सक गौरव लुथरा म्हणाले, “-२४ डायप्टर्स असलेल्या रुग्णावर ईव्हीओ व्हिसियन आयसीएल आणि टोपोगाइडेड फेम्टोलासिकने उपचार करण्यात कांकरिया यांना आलेले यश हे अभिनंदनीय आहे. यूएस एफडीए मान्यताप्राप्त तंत्रज्ञानाच्या मदतीने पूर्वी उपचार न करता येणारी गोष्ट साध्य करण्यासाठी दोन प्रक्रिया एकत्रित करण्याचा हा अभिनव वापर आहे.”

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading