मुंबईच्या महेश जगदाळे याचा सर्वाधिक गुणांचा ब्रेक !
पुणे : डेक्कन जिमखाना क्लब तर्फे आयोजित ‘मोतीलाल ओसवाल करंडक’ डेक्कन जिमखाना अखिल भारतीय खुल्या स्नुकर स्पर्धेत मुंबईच्या महेश जगदाळे आणि पुण्याच्या सुरज राठी यांनी सर्वाधिक गुणांचे ब्रेक नोंदवित आजचा दिवस गाजवला.
डेक्कन जिमखाना क्लबच्या स्नुकर हॉलमध्ये सुरू असलेल्या स्पर्धेत मुंबईच्या एलफिस्टन क्लबच्या महेश जगदाळे याने पनवेलच्या गुरूनाथ कांबळे याच्यावर ३२-३५, ५४-४०, ७५-०० असा संघर्षपूर्ण विजय मिळवला. महेश याने आपल्या विजयामध्ये ७५ गुणांचा स्पर्धेतील सर्वाधिक गुणांचा बे्रक नोंदविण्याचा आज पराक्रम केला. पुण्याच्या पुना क्लबच्या सुरज राठी याने सचिन बिचे याच्यावर १७-४१, ७१-२७, ७६(७१)-०० असा निर्णायक फ्रेममध्ये विजय मिळवत आगेकूच केली. सुरज यानेसुद्धा आज ७१ गुणांचा ब्रेक नोंदविला.
पुण्याच्या पिनाक अनाप याने प्रशांत नरोटे याच्यावर ३६-२६, ३९-६२, ३०-०९ असा संघर्षपूर्ण विजय मिळवला. रोहन साकळकर याने सलग दोन विजय मिळवत स्पर्धेत आगेकूच केली. रोहन याने श्रीकृष्ण देशपांडे याचा ४८-००, ६०-२५ असा तर, दुसर्या सामन्यात सुयोग गजभिये याचा २०-१०, ५६-०१ असा सहज पराभव केला.
सामन्यांचे सविस्तर निकालः गटसाखळी फेरीः
कृष्णराज अरकोट वि.वि. सिद्धार्थ टेंभे ३९-३७, ५९-२६;
पिनाक अनाप वि.वि. प्रशांत नरोटे ३६-२६, ३९-६२, ३०-०९;
सुरज राठी वि.वि. सचिन बिचे १७-४१, ७१-२७, ७६(७१)-००;
जेसन मल्होत्रा वि.वि. सुदीन एम. ५२-१७, ६५-२२;
हसन सय्यद वि.वि. अमितकुमार सिन्हा ३८-०८, ६४-०४;
अमोघ बंदीचोडे वि.वि. श्रीकृष्ण देशपांडे ४१-२६, ७९-३०;
रोहन साकळकर वि.वि. सुयोग गजभिये २०-१०, ५६-०१;
नितेश माने वि.वि. अभिजीत मोरे ३५-२८, ६७-२४;
अभिजीत मोरे वि.वि. सुमित गाडगीळ २१-०७, ६२-२६;
नितेश माने वि.वि. अमित सिन्हा ३९-०१, ४३-१४;
शोएब गेऊर वि.वि. स्वरूप पोकळे ३४-२६, ८५-२१;
रोहन साकळकर वि.वि. श्रीकृष्ण देशपांडे ४८-००, ६०-२५;
महेश जगदाळे वि.वि. गुरूनाथ कांबळे ३२-३५, ५४-४०, ७५(७५)-००;
