Monday, October 5, 2026
Latest NewsPUNE

महापालिका घनकचरा विभागाच्या भोंगळ कारभाराविरोधात रिपब्लिकन श्रमिक ब्रिगेडच्या वतीने जागरण गोंधळ


पुणे : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(आठवले)श्रमिक ब्रिगेड पुणे शहर अध्यक्ष सुरज गायकवाड यांच्या वतिने पुणे महापालिकेला स्वच्छ सर्वेक्षण मध्ये नुकताच देशात 10 वा क्रमांक व 5 स्टार रेटींग मिळाले ते रेटींग व क्रमांक महापालिकेने केंद्रासरकारची फसवणूक करून मिळवले असल्याचे पुराव्या सहीत सिद्ध करून महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या भोंगळ कारभारा विरूद्ध जागरण गोंधळ अंदोलन करण्यात आले .

महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम अंतर्गत घनकचरा व्यवस्थापन अधिनियम कायद्याचा भंग व पायमल्ली करून घनकचरा प्रक्रियेच्या शास्त्रशुद्ध प्रकियेचा अवलंब न करता पुणे मनपा सुमारे रोजचा 300 मेट्रिक टन व वार्षिक 1,80,000 मेट्रिक टन ओला घनकचरा ग्रामीण भागात विनानिर्जंतुकीकरण विनाशास्त्रशुद्धप्रक्रिया उघड्यावर शेतात टाकत आहे याचे पुरावे सादर करून सुमारे दोन वर्षांपासून वारंवार तक्रार करून पाठपुरावा करूनही काही उपयोग होत नाही सदर प्रकारामुळे ग्रामीण भागात नागरिकांचे आरोग्य धोक्यात घालून पुणे मनपा स्वच्छ सर्वेक्षण मध्ये नंबर काढते हा बनवाबनवीचा खेळ किती दिवस चालनार अनेक संसर्गजन्य रोग, डेंग्यु,मलेरीया,फंगल इन्फेक्शन,फुफ्फुसाचे रोग,श्वसनाचे रोग व इतर रोगराई ग्रामीण भागात झपाट्याने पसरत आहेत तसेच नैसर्गिक पाणीसाठे दुषित झाले आहेत तसेच अनेक मुक्या पशुपक्षांच्या जिवीतास धोका निर्माण झालाय याला कारणीभूत कोण..? सदर ओला घनकचरा ग्रामीण भागात टाकणेस तात्काळ बंद करण्यात याव. 


(2) पुणे महापालिका स्थापनेपासून आजपर्यंत मनपाच्या कचराहस्तांतरण केंद्रावरील कर्मचाऱ्यांसाठी एकदाही आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आलेले नाही वा आरोग्य व आपघात विमा उतरवण्यात आलेले नाही एसी मध्ये बसुन उंटावरून शेळ्या हाकनाऱ्यांना अधिकाऱ्यांना कचराहस्तांतरण केंद्रावरील कर्मचाऱ्यांना होणारा त्रास काय कळनार हि मागणी तात्काळ मान्यव्हावी व आरोग्य शिबीराचे दर सहा महिन्यातून एक वेळा आयोजन करण्यात यावे
(3)त्याच बरोबर कचराहस्तांतरण केंद्रावरील कचरावाहतुक करणाऱ्यां कर्मचाऱ्यांचा अपघात विमा आरोग्य विमा उतरवण्यात येत नाही कोणत्याही प्रकारचा आपघात झाल्या आर्थिक तडजोड होते त्या मध्ये कर्मचाऱ्यांचे मोठ्या प्रमाणात हाल होतात त्यामुळे कचरावाहतुक कर्मचाऱ्यांचा अपघात विमा व आरोग्य विमा तात्काळ उतरवण्यात यावा
(4)शासन नियम धाब्यावर बसवून हडपसर मुंढवा क्षेत्रीय कार्यालयात गेल्या 8 ते 10 वर्षांपासून आरोग्य निरीक्षक यांच्या बदली प्रक्रिया न राबविल्याने सदर अधिकारी अत्यंत लाचखोर व भ्रष्टाचारी झाले असून नागरिकांमध्ये त्यांच्या बद्दल प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे त्यांचेवर कारवाई करण्याखेरीज मनपा त्यांना स्वच्छ सर्वेक्षणचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी घेऊन जातेय नागरिकांमध्ये अशीही चर्चा आहे कि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांच्या कडुन हप्ते वसुली करून घेण्यासाठी त्यांना त्या ठिकाणी ठेवलय त्यांच्या शासन नियमानुसार तात्काळ बदली करण्यात याव्यात
ह्या प्रमुख मागण्यांसह इतर मागण्यासाठी हे लक्षवेधी अंदोलन करण्यात आले या अंदोलनाचे आयोजन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(आठवले)श्रमिक ब्रिगेड चे शहर अध्यक्ष सुरज गायकवाड यांनी केले होते अंदोलनाचे नेतृत्व माजी आमदार एल.टी.सावंत,श्रमिक ब्रिगेड चे प्रदेश अध्यक्ष सतीश केदारी, प्रदेश कार्याध्यक्ष विष्णु भोसले,रिपाई नेते आसित गांगुर्डे, रिपाई शहर अध्यक्ष शैलेंद्र चव्हाण वरिष्ठ उपाध्यक्ष महादेव कांबळे कामगार महेंद्र कांबळे यांनी केले अंदोलनास आशिष आल्हाट रामभाऊ कर्वे सतिश आल्हाट राहुल कांबळे विशाल धावारे मारूती गायकवाड शंकेश पवार रितेश पाडोळे संदेश गंगावणे सनी वाघमारे यांनसह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading