‘वसंतोत्सव विमर्श’ उपक्रमात ‘जोडराग’
पुणे : वसंतराव देशपांडे प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या ‘वसंतोत्सव विमर्श’ (Vasantotsav Vimarsh)0 या उपक्रमात दरवर्षी संगीतविषयक सप्रयोग व्याख्यान वा कार्यशाळा आयोजित केली जातात. यंदाच्या वर्षी ‘जोडराग’ ह्या संकल्पनेवर विशेष कार्यक्रम ‘विमर्श’ अंतर्गत होणार आहे.
उद्या मंगळवार दि. १६ जानेवारी २०२४ रोजी सायं. ६:३० ते ९ या वेळेत डी पी रस्ता एरंडवणे येथील पंडित फार्म्स या ठिकाणी ‘वसंतोत्सव विमर्श’ होणार असून सर्व संगीत विद्यार्थी, कलाकार व रसिक यांना यासाठी विनामूल्य खुला प्रवेश असणार आहे.
विनामूल्य प्रवेश देण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी कळविली आहे. आग्रा घराण्याचे ज्येष्ठ गायक पं. राम देशपांडे हे जोडरागांची पेशकश करून त्याविषयी आपले विचार व्यक्त करतील. त्यांना डॉ. चैतन्य कुंटे (हार्मोनियम) व संजय देशपांडे (तबला) हे साथसंगत करतील.
