Tuesday, June 16, 2026
Latest NewsPUNE

भंडारा डोंगरावरील संत तुकाराम महाराज मंदिरासाठी चव्हाण पाटील परिवाराची मदत

पुणे:देहू जवळील भंडारा डोंगरावर उभारण्यात येत असलेल्या जगतगुरु संत तुकाराम महाराज मंदिरासाठी धायरी येथील चव्हाण पाटील परिवाराच्या वतीने दोन लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस व सातारा जिल्हा प्रभारी श्रीरंग चव्हाण पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त कैलासराव चव्हाण- पाटील व प्रदीप श्रीरंग चव्हाण -पाटील यांच्या वतीने संत तुकाराम महाराज मंदिरासाठी आज आर्थिक मदत देण्यात आली.

भंडारा डोंगर मंदिराचे डॉ. पंकज महाराज गावडे यांच्याकडे काँग्रेसचे जेष्ठ नेते उल्हास पवार व देविदास भन्साळी यांच्या हस्ते मदतीचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. यावेळी काँग्रेसचे माजी सरपंच राणोजी पोकळे, काॅसमाॅस बँकेचे संचालक मिलिंद पोकळे, खडकवासला राष्ट्रवादीचे अध्यक्ष काकासाहेब चव्हाण, महिला राष्ट्रवादी च्या माजी अध्यक्षा स्वाती पोकळे, अलका चव्हाण, श्रीकृष्ण बराटे, राष्ट्रसेवा समुहाचे अध्यक्ष राहुल पोकळे, जिल्हा सहकार आघाडीचे अध्यक्ष लहुआण्णा निवंगुणे, संदिप चव्हाण, ह.भ.प. पांडुरंग जगताप, काळभैरवनाथ पतसंस्थेचे अध्यक्ष आर.जी. यादव, जिल्हा तलाठी संघटनेचे माजी अध्यक्ष पंढरीनाथ पोकळे, बी.टी. आढाव, खडकवासला अध्यक्ष राहुल मते , अवधूत मते आदींसह सर्व पक्षिय नेते उपस्थित होते.

One thought on “भंडारा डोंगरावरील संत तुकाराम महाराज मंदिरासाठी चव्हाण पाटील परिवाराची मदत

  • Priya Joshi

    खूप चांगले काम
     https://www.bruhaspatinath.com/pasaydaan-marathi-lyrics/

    Reply

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading