Tuesday, June 16, 2026
Latest NewsPUNE

जगदीश मुळीक फाउंडेशनचे आरोग्य शिबिराचा अठरा हजार नागरिकांना लाभ

पुणे : जगदीश मुळीक फाउंडेशनच्या वतीने आज येरवडा जेल समोरील के. के. भवन सभागृहात आयोजित केलेल्या महाआरोग्य शिबिरात १८ हजार नागरिकांनी लाभ घेतला. माजी आमदार जगदीश मुळीक आणि स्थायी समितीचे माजी अध्यक्ष योगेश मुळीक यांनी या शिबिराचे आयोजन केले होते.

हृदयरोग चिकित्सा व शस्त्रक्रिया, डिजिटल एक्सप्रेस, डायलिसिस, रक्त तपासण्या, कर्करोग चिकित्सा व शस्त्रक्रिया स्त्रीरोग चिकित्सा मोफत डोळे तपासणी व चष्मेवाटप बालरोग चिकित्सा दिव्यांगांना कृत्रिम अवयव व्हेल चेअर वितरण आदी आरोग्य सुविधा दिल्याची माहिती माजी आमदार जगदीश मुळीक यांनी दिली.

संयोजक जगदीश मुळीक म्हणाले, बदलत्या जीवनशैली प्रमाणे आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्या आहेत या समस्यांचे निदान आणि उपचार खर्चिक असतात सर्वसामान्य नागरिकांना ते परवडत नाही याचा विचार करून या विनामूल्य महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. अठरा हजाराहून अधिक नागरिकांनी त्याचा लाभ घेतला. त्यांच्या विविध आरोग्य तपासण्या आणि शस्त्रक्रिया विनामूल्य करण्यात आल्या.

पुणे शहर भाजपचे अध्यक्ष धीरज घाटे, प्रदेश उपाध्यक्ष राजेश पांडे, माजी मंत्री दिलीप कांबळे, माजी आमदार बापू पठारे, लोकसभा संयोजक श्रीनाथ भिमले, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष हेमंत रासने, वडगाव शेरी मतदार संघाचे अध्यक्ष अर्जुन जगताप, माजी नगरसेविका रेखा टिंगरे, माजी नगरसेवक आयुब शेख, अनिल टिंगरे, राहुल भंडारे, ऐश्वर्या जाधव, सुमन पठारे, उद्योजक अभय भुतडा, डॉ. ज्ञानेश गवारे, डॉ. आशिष तापडिया, राजेंद्र खांदवे किशोर विटकर, सागर काळे, सुरज दुबे, लालजी मिश्रा, रमेश गव्हाणे, गणेश देवकर, गणेश ढोकले यांची प्रमुख उपस्थिती होती.

पुणे महानगरपालिका, हेल्थ प्रो, रायझिंग मेडिकेअर हॉस्पिटल, लक्ष फाउंडेशन, सुराज्य सर्वांगीण विकास प्रकल्प, एच. व्ही. देसाई नेत्र रुग्णालय, डायग्रोपिन डायजेस्टिक सेंटर या वैद्यकीय क्षेत्रातील संस्थांचे सहकार्य मिळाले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading