Monday, October 5, 2026
Latest NewsPUNE

फिटजीची राष्ट्रीय स्तरावरील शिष्यवृत्ती परीक्षा ७ जानेवारीला

पुणे  – फिटजी इन्स्टिटयूटने विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण जडणघडणीचा शास्त्रीय आणि मानसिकदृष्ट्या सर्वांगीण विचार करून फिटजी टॅलेंट रिवॉर्ड एक्झाम (FTRE) या राष्ट्रीय स्तरावरील परीक्षेची घोषणा केली आहे. या परीक्षेमधून पात्र विद्यार्थ्यांना करोडो रुपयांची रोख पारितोषिके तसेच फी मध्ये भरघोस सवलतीद्वारे शिष्यवृत्तीचा लाभ घेता येणार आहे. हि परीक्षा दि. ७ जानेवारी रोजी ऑफलाइन मोडमध्ये होणार असून फिटजी तर्फे याचे आयोजन करण्यात आले आहे. इयत्ता पाचवी ते अकरावीमध्ये शिकत असलेले विद्यार्थी या परीक्षेसाठी पात्र असून परीक्षेसाठी कोणतीही एक तारीख निवडू शकतात. या परीक्षेच्या माध्यमातून जेईई मेन, जेईई ऍडव्हान्स, बिटसॅट, ऑलिम्पियाड्स, दहावी आणि बारावी बोर्ड्स, एनटीएसई आणि ज्युनियर ऑलिम्पियाड्ससह विविधप्रकारच्या दर्जेदार शैक्षणिक परीक्षांच्या तयारीसाठी एक व्यापक आणि परिपूर्ण व्यासपीठ उपलब्ध होते. या व्यासपीठाद्वारे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धात्मक आणि शैक्षणिक परीक्षा देण्याची क्षमता वाढविण्याबरोबरच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी हि परीक्षा अत्यंत उपयुक्त असल्याचे फिटजी पुणे केंद्र प्रमुख राजेश कर्ण यांनी स्पष्ट केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading