Tuesday, June 16, 2026
Latest NewsPUNETOP NEWS

नववर्षाच्या पूर्वसंध्येला तरुणाईने दिला ‘दारू नको, दूध प्या’चा संदेश

पुणे: दारू नको दूध प्या, मानवतेचा बोध घ्या… बाटली फोडा, दूध जोडा… दारुचा पाश जीवनाचा नाश… दारु सोडा आनंद जोडा… अशा घोषणा देत नववर्षाच्या पूर्वसंध्येला पुण्यातील आनंदवन व्यसनमुक्ती केंद्र व महाविद्यालयीन तरुणाईने जनजागृती केली. नववर्षाचे स्वागत करताना चांगले विचार आणि संकल्प मनात ठेवून प्रत्येकाने व्यसनमुक्त भारताचे स्वप्न रंगवावे. नववर्षाचे स्वागत दारू न पिता दूध पिऊन करावे असा संदेश देत दूध वाटप  करण्यात आले.
डेक्कन जवळील गुडलक चौकातील कलाकार कट्टा येथे आनंदवन व्यसनमुक्ती व पुनर्वसन केंद्रातर्फे दारू नको, दूध प्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. उपक्रमाला कात्रज डेअरी, मराठवाडा मित्र मंडळ कॉलेज आॅफ कॉमर्स आणि पुणे पोलीस, पुणे शहर वाहतूक शाखा, आपलं फाऊंडेशन यांनी सहकार्य केले. यावेळी  पोलिस उपायुक्त संदीप सिंह गिल, केंद्राचे अध्यक्ष डॉ.अजय दुधाणे, कात्रज डेअरीचे कुमार मारणे, धनजंय वाडकर, अनुपकुमार  कुंडेटकर, ऋषिकेश इंगळे, अविनाश गेंगजे, संतोष पटवर्धन, कृष्णा भताने, विशाल शिंदे, दत्तात्रय सोनार, संतोष पटवर्धन, अनिरुद्ध हळंदे, रवींद्र साळेगावकर, गणेश बगाडे, अपर्णा कुराडे, किरण ओरसे, महाविद्यालयाचे  प्रवीण कड, ओमप्रकाश अजबे, प्रमोद सपकाळ, आपलं फाऊंडेशनचे मनीष भोसले, डॉ. कृष्णा गायकवाड, रजत श्रीवास्तव, पवन जैन आदी उपस्थित होते.
 डाॅ. अजय दुधाणे म्हणाले, नवीन वर्षाचे स्वागत तरुणाई दारूचे सेवन करून करते. यामुळे व्यसनाधीनता वाढत जाते. नवीन वर्षाची सुरुवात चांगल्या पद्धतीने करावी आणि व्यसनाधीनतेची झालर नववर्षाच्या पूर्वसंध्येला नसावी यासाठी दूधाचे वाटप करून दारू नको दूध प्या हा उपक्रम राबविला जातो.
कुमार मारणे म्हणाले, व्यसनाधिनतेच्या विळख्यात अडकत चाललेल्या तरुणाईला योग्य दिशा दाखविण्याकरीता हा उपक्रम दरवर्षी राबवला जातो. मराठवाडा मित्र मंडळ कॉलेज आॅफ कॉमर्समधील एनएसएसच्या विद्यार्थ्यांनी देखील सक्रिय सहभाग घेतला. तर दारु नको दूध प्या, हा संदेश देत दूध वाटप देखील केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading