Saturday, June 13, 2026
Latest NewsPUNE

नामदेव हितवर्धक मासिक व ना.स.प.चे आधार वड ऋषितुल्य तु. पां. मिरजकर काळाच्या पडद्याआड

पुणे ः नामदेव हितवर्धक मासिकाचे मुख्य मार्गदर्शक व नामदेव समाजोन्नती परिषदेचे माजी मुख्य विश्वस्त तुकाराम पांडुरंग मिरजकर यांचे नुकतेच वयाच्या ९४ व्या अल्पशा आजाराने दु:खद निधन झाले. त्यांच्या इच्छेनुसार त्यांचा देह मेडिकल कॉलेजला अभ्यासासाठी दान करण्यात आला. त्यांच्या पश्‍चात मुलगा, सून, दोन मुली, जावई, नात सुना, नात जावई, नातवंडे, पतवंडे असा मोठा परिवार आहे.

तु.पां. मिरजकर यांनी आपल्या वयाच्या ९४ वर्षाच्या कारकिर्दीमध्ये अपंग, कुष्ठरोगी व सामाजिक क्षेत्रात अतुलनीय कार्य केले. ते ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ फीजीकल मेडीसिन ॲड रिहॅबिलेशन, मुंबई या संस्थेचे संचालक तर बाॅम्बे लेप्रोसी प्रोजेक्टचे विश्वस्त म्हणून कार्यरत होते. त्यांनी अपंगाकरीता मुंबई येथे रिहॅबिलिटेशन ऑफ द डिसेबल संस्थेची स्थापना करून अपंगांना व्यावसायिक शिक्षण देऊन त्यांना स्वावलंबी बनवले.

कै. अजित वाडेकर यांचे समवेत “ऑल इंडिया क्रिकेट असोसिएशन फॉर द फिजीकल चॅलेंज मुंबई” या संस्थेची स्थापना करून आंतरराष्ट्रीय स्तरावर अपंगाकरीता प्रथमच दिव्यांग स्पर्धा सुरू केल्या. या कार्यात भारताचे माजी कर्णधार सुनील गावसकर, सचिन तेंडुलकर, अनिल कुंबळे, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी, पृथ्वीराज चव्हाण यांचे मोलाचे सहकार्य मिळाले होते.

भारतातील पहिले बायोमेडीकल इंजिनिअर स्वतः बनून मुंबई विद्यापीठा अंतर्गत भारतात प्रथमच सर्टिफिकेट कोर्स ते पदवीका अभ्यासक्रम सुरू केला. इंग्लंड, जर्मनी, फ्रान्स, डेन्मार्क, ब्रिटन या देशात भारताचे प्रतिनिधीत्व करून आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रबंध सादर करून भारताचे नाव उज्वल केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading