Thursday, June 18, 2026
Latest NewsPUNE

पुरुषोत्तम करंडक महाअंतिम फेरीला सुरुवात


पुणे : महाराष्ट्रीय कलोपासक आयोजित पुरुषोत्तम करंडक स्पर्धेच्या महाअंतिम फेरीला आज (दि. 27) सुरुवात झाली. पहिल्या सत्रात टिळक आयुर्वेद महाविद्यालय, पुणे (पिक्सल्स), देवगिरी महाविद्यालय नाट्यशास्त्र विभाग, संभाजीनगर (खळगं खळगं), डॉ. विठ्ठलराव खोब्रागडे कला व वाणिज्य महाविद्यालय, नागपूर (न्यायालयात जाणारा प्राणी), प्रा. राम मेघे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ॲन्ड रिसर्च (साकव) तर सायंकाळच्या सत्रात मॉडर्न महाविद्यालय गणेशखिंड, पुणे (फेलसेफ), सिपना अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय, अमरावती (रात्र अंधार), शहाजी लॉ कॉलेज, कोल्हापूर (जंगल जंगल बटा चला है), सर परशुरामभाऊ महाविद्यालय, पुणे (कृष्णपक्ष) या संघांचे सादरीकरण झाले.
गुरुवारी (दि. 28) सादर होणाऱ्या एकांकिका : वेळ सकाळी 9 : फिनोलेक्स अभियांत्रिकी महाविद्यालय, रत्नागिरी (बोबड्या), प्रताप महाविद्यालय, अमळनेर (तो पाऊस आणि टाफेटा), वसंतराव नाईक शासकीय कला व समाज विज्ञान संस्था, नागपूर (समांतर), डी. बी. जे. महाविद्यालय, चिपळूण (हॅपी फादर्स डे). सायंकाळी 5 : मराठवाडा विधी महाविद्यालय, पुणे (रवायत ए विरासत), देशभक्त रत्नाप्पा कुंभार वाणिज्य महाविद्यालय, कोल्हापूर (असणं नसणं), शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, संभाजीनगर (चुकलं तर माफ करा), डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नाट्यशास्त्र विभाग, संभाजीनगर (अल्प भूधारक).

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading