दिल्ली संघाचा सलग दुसरा विजय; पाँडेचरी, पंजाब-हरयाणा, तेलंगणा संघांनी गुणांचे खाते उघडले !!
पुणे : नेशन वाईड लॉयर्स क्रिकेट संघटना आणि पुणे बार असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित २६ व्या वकीलांच्या राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत दिल्ली हायकोर्ट संघाने सलग दुसरा तर, पाँडेचरी संघ, पंजाब-हरयाणा संघ आणि तेलंगणा या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून पहिल्या विजयाची नोंद केली.
डेक्कन जिमखाना क्लब येथे झालेल्या आणि ३९९ धावांचा पाऊस पडलेल्या सामन्यात प्रदीप यादव याच्या फलंदाजीच्या जोरावर दिल्ली संघाने यजमान महाराष्ट्र संघावर २३ धावांनी पराभव करून सलग दुसरा विजय नोंदविला. दिल्ली संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना २११ धावांचा डोंगर रचला. प्रदीप यादव याने ३७ चेंडूर ७ चौकार आणि ३ षटकारांसह ६५ धावांची खेळी केली. एंजल भारव्दाज याने ५५ धावांचे योगदान दिले. प्रदीप आणि ऐंजल या दोघांनी तिसर्या गड्यासाठी २८ चेंडूत ५८ धावांची स्फोटक भागिदारी करत मोठ्या धावसंख्येचा पाया रचला. या आव्हानाचा पाठलाग करताना महाराष्ट्र संघाने चांगली सुरूवात केली होती. शुभम शेलार (६७ धावा) आणि राजेंद्र मिसाळ (४३ धावा) यांनी महाराष्ट्र संघाकडून कडवा प्रतिकार केला. परंतु मोक्याच्या क्षणी फलंदाज बाद होत गेले. यामुळे धावा आणि चेंडू यातील अंतर वाढून संघाला पराभव स्विकारावा लागला.
विकी जी. याच्या अचूक गोलंदाजीच्या जोरावर पाँडेचरी संघाने कर्नाटक संघाचा ४२ धावांनी पराभव करून गुणांचे खाते उघडले. नरवाल सिंग याच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर पंजाब-हरयाणा संघाने आंध्रप्रदेश संघाचा १८ धावांनी पराभव करत पहिला विजय नोंदविला. स्वामी एस. याच्या गोलंदाजीमुळे तेलंगणा संघाने केरळ संघाचा ४ गडी राखून पराभव केला.
सामन्याचा संक्षिप्त निकालः गटसाखळी फेरीः
दिल्ली संघः २० षटकात ७ गडी बाद २११ धावा (प्रदीप यादव ६५ (३७, ७ चौकार, ३ षटकार), एंजल भारव्दाज ५५ (२७, ७ चौकार, ३ षटकार), गोल्डी राव २५, मुकूल सेलोकर २-२६, असद शेख २-४१, योगेश भारती २-४२);(भागिदारीः तिसर्या गड्यासाठी ऐंजल आणि प्रदीप ५८ (२८) वि.वि. महाराष्ट्र संघः २० षटकात ७ गडी बाद १८८ धावा (शुभम शेलार ६७ (३२, ८ चौकार, ४ षटकार), राजेंद्र मिसाळ ४३, विवेक देशमुख २२, उमेश चांडोले १८, अभिनव शर्मा १-३३); सामनावीरः प्रदीप यादव;
पाँडेचरी संघः २० षटकात ६ गडी बाद १७९ धावा (जना के. ५२ (३३, ६ चौकार, २ षटकार), वीरामुर्थी के. ३२, सुंदर सी. ३४, आर. किर्थी २-४०) वि.वि. कर्नाटक संघः २० षटकात ८ गडी बाद १३७ (आर. किर्थी २२, गोथम पी. ३९, विकी जी. ४-१९, कनागा राज २-२३); सामनावीरः विकी जी.;
पंजाब-हरयाणा संघः २० षटकात ७ गडी बाद ११२ धावा (यशपाल राठी ६० (५१, ९ चौकार), नरवाल सिंग २०, सिवराम सी. ३-१८, सिसीधर के. ३-१८) वि.वि. आंध्रप्रदेश संघः १६.५ षटकात १० गडी बाद ९४ धावा (श्रीनिवासराव मुद्दपट्टी १९, जी. नीलोथापल १८, मीरावकीली सी. १९, नरवाल सिंग ३-२१, एम. गिरी २-१२); सामनावीरः नरवाल सिंग;
केरळ संघः २० षटकात ४ गडी बाद १२२ धावा (अॅलन सी. नाबाद ६५ (६४, ८ चौकार), केसव कुमार २६, स्वामी एस. २-२५ पराभूत वि. तेलंगणा संघः १६ षटकात ६ गडी बाद १२५ धावा (सुमन गौड ४१, मनोज पी. ३४, सुधीन पी. २-२०); सामनावीरः स्वामी एस.;
