Monday, June 22, 2026
Latest NewsPUNE

जाधवर फेस्टिव्हलमध्ये सामाजिक विषयांवर नाटय-नृत्याद्वारे जनजागृती

पुणे : स्त्रियांवर होणारे अत्याचार थांबवा… आई-वडिल, आजी-आजोबा असा एकत्र कुटुंबाचा नात्यामधील गोडवा टिकवा… अशा सामाजिक संदेशांसह देशासाठी लढणा-या जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासोबत विविध विषयांसंबंधी विद्यार्थ्यांनी नाट्य – नृत्यातून विद्यार्थ्यांनी जनजागृती केली. विविध नाटयगीते, बालगीते आणि चित्रपटगीतांच्या माध्यमातून सादर केलेल्या नृत्याविष्काराने बालचमूंच्या रुपात प्रत्यक्ष तारे जमीन पर अवतरले. महाराष्ट्रीय संस्कृतीसह भारतातील वैविध्यपूर्ण संस्कृती व वेशभूषेचे दर्शन घडवित विद्यार्थ्यांनी विविधतेतून एकतेचा संदेश दिला.

न-हे येथील जाधवर ग्रुप आॅफ इन्स्टिटयूटच्या ७ व्या जाधवर फेस्टिव्हलमध्ये संस्थेतील विद्यार्थ्यांनी विविध नृत्यरचना व नाटिका सादर केल्या. यावेळी अभिनेते सिद्धेश्वर झाडबुके, अशितोष वाडेकर, मिलिंद दास्ताने, विजय पटवर्धन, अमीर तडवळकर, हेमांगी कवी, सुरेखा कुडची यांसह संस्थेचे प्राचार्य डॉ.सुधाकर जाधवर, उपाध्यक्ष अ‍ॅड. शार्दुल जाधवर, खजिनदार सुरेखा जाधवर व शाळांचे मुख्याध्यापक शिक्षक, पदाधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

रंगीबेरंगी पोषाखात आपल्या निरागस नृत्यशैलीने बच्चे कंपनीने उपस्थितांची मने जिंकली. स्नेहसंमेलनात १६ हजारहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेत आपली कला सादर केली. भारतातील विविध राज्यांमधील संस्कृतीचे दर्शन आपल्या कलाविष्कारातून सादर करण्यासोबतच विविध सामाजिक विषयांवरील नाटिकाही संमेलनात सादर करण्यात आल्या.

फेस्टिव्हलमध्ये प्राचार्य डॉ.सुधाकरराव जाधवर कला व वाणिज्य महाविद्यालय, शार्दुल सुधाकरराव जाधवर वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, प्रा.डॉ.सुधाकरराव जाधवर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, इन्स्टिटयूट आॅफ नर्सिंग, पॅराडाईज ज्युनियर कॉलेज, पॅराडाईज इंग्लिश मिडियम स्कूल, जाधवर इंटरनॅशनल स्कूल, प्रा.डॉ.सुधाकरराव जाधवर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय इंद्रप्रस्थ, पॅराडाईज किडस्, जाधवर इंग्लिश मिडियम स्कूल अ‍ँड ज्युनियर कॉलेज, आदित्य इन्स्टिटयूट आॅफ मॅनेजमेंट, प्रा.डॉ.सुधाकरराव जाधवर विज्ञान महाविद्यालय या संस्थेतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading