Tuesday, June 16, 2026
Latest NewsPUNE

पद्मभूषण बेगम परवीन सुलताना यांना यावर्षीचा वत्सलाबाई जोशी पुरस्कार प्रदान

पुणे : आर्य संगीत प्रसारक मंडळाच्या वतीने देण्यात येणारा वत्सलाबाई जोशी पुरस्कार यावर्षी पतियाळा घराण्याच्या ज्येष्ठ गायिका पद्मभूषण बेगम परवीन सुलताना यांना आज महोत्सवाच्या चौथ्या दिवशी प्रदान करण्यात आला. भारतीय शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रात बहुमोल योगदान देणाऱ्या कलाकारांना २००७ सालापासून मंडळाच्या वतीने दरवर्षी सदर पुरस्कार देत गौरविण्यात येते. रोख रु. ५१ हजार व मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप असून मुकुंदनगर येथील महाराष्ट्रीय मंडळाचे क्रीडांगण येथे दा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी आर्य संगीत प्रसारक मंडळाचे श्रीनिवास जोशी, शिल्पा जोशी, शुभदा मुळगुंद, पंडित उपेंद्र भट, डॉ प्रभाकर देशपांडे, मिलिंद देशपांडे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी आपल्या भावना व्यक्त करताना बेगम परवीन सुलताना म्हणाल्या, ” भारतरत्न पंडित भीमसेन जोशी हे माझ्या मोठ्या भावासारखे होते. आज वत्सलाबाई जोशी या माझ्या वहिनीच्या नावाने मला पुरस्कार मिळतोय ही माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे.  या पुरस्काराने मला आणखी चांगली कामगिरी करायची ऊर्जा मिळाली आहे, आणि जबाबदारी देखील वाढली आहे. वत्सलाबाई जोशी यांच्या हातचे पोहे मी अनेकदा खाल्ले आहे. पोहे जेव्हा छान होत तेव्हा पोहे सूर में बने है… अशी दाद आम्ही सर्वच जण देत असू, अशी आठवण देखील बेगम परवीन सुलताना यांनी सांगितली.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading