Monday, August 31, 2026
ENTERTAINMENTLatest NewsTOP NEWS

अभिनेता श्रेयस तळपदेला हृदयविकाराचा झटका

मुंबई : अभिनेता श्रेयस तळपदे (Actor Shreyas Talpade) याला काल (दि. 14) रात्री हृदयविकाराचा झटका आला आहे. चित्रपटाच्या शूटिंगवरून  घरी परतल्यानंतर त्याची प्रकृती बिघडली. अन् त्यानंतर श्रेयसला मुंबईतील अंधेरीतील बेलेव्ह्यू रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

हिंदी, मराठी फिल्म इंडस्तरीमध्ये नाव कामावलेला मराठमोळा अभिनेता श्रेयस सध्या ‘वेलकम 3’  (Welcome 3 ) या चित्रपटाच्या शुटींगमध्ये व्यस्थ होता. श्रेयस गुरुवारी सकाळी चित्रपटाच्या शूटिंगसाठी गेला होता. दिवसभर काम आटोपल्यानंतर तो रात्री घरी आला होता. घरी येताच त्याला  अस्वस्थ वाटू लागल्याने त्याला ताबडतोब रुग्णालयात दाखल करण्यात आले. रात्री श्रेयसवर एंजिओप्लास्टी सर्जरी करण्यात आली असून त्याची प्रकृती ठीक असल्याचे डॉक्टरकडून सांगण्यात आले आहे.

दरम्यान, श्रेयस तळपदे वेलकम 3 या आगामी चित्रपटामध्ये दिसणार आहे. या चित्रपटामध्ये श्रेयस तळपदे यांच्यासह अभिनेता अक्षय कुमार,रवीना टंडन, दिशा पटानी, जॅकलीन फर्नांडिस, लारा दत्ता, सुनील शेट्टी, संजय दत्त, परेश रावल, अर्शद वारसी, तुषार कपूर, राजपाल यादव, जॉनी लीव्हर, किकू शारदा, कृष्णा अभिषेक, राहुल देव ही तगडी स्टारकास्ट असणार आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading