साशा वॉल्टस् अँड गेस्टस् चा ३० वर्षांचा गौरवशाली प्रवास सांगणाऱ्या प्रदर्शनीचे आयोजन
पुणे : ग्योथं इन्स्टिट्यूट – मॅक्स म्यूलर भवन आणि सेंटर ऑफ कंटेंम्परी डान्स यांच्या वतीने बर्लिन येथील सुप्रसिद्ध साशा वॉल्टस् अँड गेस्टस् या नृत्यसंस्थेच्या ३० वर्षांचा गौरवशाली प्रवास सांगणाऱ्या प्रदर्शनीचे आयोजन येत्या २२ डिसेंबर पर्यंत करण्यात आले आहे.
शिवाजीनगर येथील कृषी महाविद्यालयाजवळील हातकागद संस्थेच्या आवारात सकाळी ११ ते सायंकाळी ७ दरम्यान पुणेकर रसिकांना ही प्रदर्शनी पाहता येणार असून यादरम्यान आयोजित अनेकविध नृत्यविषयक कार्यशाळांचा आस्वादही घेता येणार आहे. सदर प्रदर्शनी विनामूल्य आणि सर्वांसाठी खुली असेल याची कृपया नोंद घ्यावी.

साशा वॉल्टस् अँड गेस्टस् ही बर्लिनची सर्वात महत्त्वाची संस्था असून आपल्या समकालीन नृत्यासाठी ओळखली जाते. भव्य निर्मिती आणि अभूतपूर्व नृत्यदिग्दर्शन ही संस्थेची वैशिष्ट्ये असून कलात्मक दृष्टीकोन असलेले नृत्यदिग्दर्शनाचा ३० वर्षाचा संस्थेचा प्रवास यां चित्रप्रदर्शनीमध्ये रसिकांना पाहता येणार आहे.
