आर्या स्पोर्टस टी-20 क्रिकेट स्पर्धेत फायटर्स संघाची विजयी सलामी
पुणे : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि अण्णासाहेब पठारे यांच्या वाढदिवसानिमित्त खराडी जिमखाना व आर्या स्पोर्टस यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आर्या स्पोर्टस टी-20 क्रिकेट स्पर्धेत साखळी फेरीत गणेश मिसाळ (55 धावा व 3-36) याने केलेल्या अष्टपैलू खेळीच्या जोरावर फायटर्स संघाने पूना स्पोर्टस संघाचा 14 धावांनी पराभव करून विजयी सलामी दिली.
खराडी जिमखाना येथील क्रिकेट मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत प्रथम फलंदाजी करताना फायटर्स संघाने 20षटकात 8बाद 204धावा केल्या. यात गणेश मिसाळने 26चेंडूत 5चौकार व 3 षटकाराच्या मदतीने 55 धावा चोपल्या. त्याला विजय पल्लुरू 25, आकाश यादव 16, स्वप्निल आवळे 12, विक्रम माळी 10 यांनी धावा काढून साथ दिली. पूना स्पोर्टसकडून संदीप शिंदे(3-38), अथर्व शिंदे(2-33), मोहम्मद अब्दुल्ला(1-28) यांनी सुरेख गोलंदाजी केली. याच्या उत्तरात पुना स्पोर्टस संघाला 20 षटकात 8बाद 190धावाच करता आल्या. यात ओंकार येवले 70, संदीप शिंदे 47, सय्यद पटेल 23 यांनी दिलेली लढत अपुरी ठरली. फायटर्स संघाकडून गणेश मिसाळ(3-36)ने फलंदाजीप्रमाणे गोलंदाजीतही कमाल दाखवली. त्याला स्वप्निल आवळे(2-31) समीर पटेल(1-17), विनय पल्लूरू(1-40) यांनी अचूक गोलंदाजी करून साथ दिली. सामनावीर गणेश मिसाळ ठरला.
स्पर्धेचे उदघाटन श्री शिवछत्रपती जीवन गौरव पुरस्कार विजेते श्री अण्णासाहेब पठारे, नगरसेवक महेंद्र पठारे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी युवा नेते रविन्द्र पठारे, विलास पठारे, निखिल पठारे, सागर पठारे, स्वप्निल पठारे, कैलास पठारे, संतोष पठारे, रोहित पठारे, दिलिप पठारे, महेश शिंदे, राहुल शिंदे, गणेश शिंदे, सागर शिंदे, आकाश ताकवले, आणि खराडी जिमखानाचे अध्यक्ष सतीश चंद्रकात पठारे उपस्थित होते
निकाल: साखळी फेरी:
फायटर्स: 20षटकात 8बाद 204धावा(गणेश मिसाळ 55(26,5×4,3×6), विजय पल्लुरू 25, आकाश यादव 16, स्वप्निल आवळे 12, विक्रम माळी 10, संदीप शिंदे 3-38, अथर्व शिंदे 2-33, मोहम्मद अब्दुल्ला 1-28) वि.वि.पुना स्पोर्टस: 20 षटकात 8बाद 190धावा (ओंकार येवले 70(44,11×4), संदीप शिंदे 47(27,5×4,2×6), सय्यद पटेल 23, गणेश मिसाळ 3-36, स्वप्निल आवळे 2-31, समीर पटेल 1-17, विनय पल्लूरू 1-40); सामनावीर – गणेश मिसाळ; फायटर्स संघ 14धावांनी विजयी.
