संसद भवनात पुन्हा एकदा घुसखोरी; महाराष्ट्रातील एकाचा समावेश
नवी दिल्ली : संसदेवर हल्ला झाल्याचे 22 वर्ष पूर्ण होत असतानाच आज पुन्हा एकदा संसदेत घुसखोरी झाल्याचे समोर आले आहे. प्रेक्षक गॅलरीतून आलेल्या दोघांनी लोकसभेचे हिवाळी अधिवेशन (Parliament Winter Session) सुरू असताना धुराच्या नळकांड्या पेटवल्याची धक्कादाय प्रकार घडला आहे. त्यामुळे नव्या संसद भावनांची सुरक्षा राम भरोसे असल्याचे स्पष्ट झाले आहे. सुदैवाने या घटनेत कोणत्याही खासदाराला दुखापत झालेली नाही.
नक्की काय घडले ?
आज सकाळी जेव्हा लोकसभेत अधिवेशन सुरू होते तेव्हा लोकसभेच्या प्रेक्षक गॅलरीतून दोन तरुण उडी मारून लोकसभेच्या चालू सत्रात घुसले. यावेळी लोकसभेत जवळपास 100 खासदार उपस्थित होते. त्यांनी उडया मारल्यानंतर सभागृहात एकाच गदारोळ माजला. यावेळी काही खासदारांनी त्या दोघांना पकडण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी या तरुणांनी आपल्या बुटामध्ये लपवलेली (Smoke pipes) धुराच्या नळकांड्या बाहेर काढल्या अन् सभागृहात सगळीकडे धूरच धूर झाला. काही वेळातच सुरक्षा रक्षकांनी या तरुणांना ताब्यात घेतले.
यावेळी आणखी दोन जणांनी संसदेच्या बाहेर निदर्शनं करत घोषणाबाजी केली. संसदेच्या बाहेर घोषणाबाजी करणाऱ्या दोघांमध्ये महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यात राहणाऱ्या एका तरुणाचा समावेश आहे. तसेच संसदेच्या बाहेर घोषणाबाजी करणारा आणि स्मोक कँडल जाळणाऱ्यात एका महिला असून ती हरयाणाची रहिवासी आहे. तर एक जण लातूरचा आहे. या चौघांनीही म्हैसूरच्या खासदारामार्फत पासेस बनवले होते अशी माहिती मिळाली आहे.
