Monday, August 31, 2026
Latest NewsPUNE

भाजपचे कार्यकर्ते २ लाख घरापर्यंत श्रीराम मंदिराच्या उद्घाटनाच्या मंगलं अक्षता पोहोचविणार- धीरज घाटे


पुणे:   येत्या २२ जानेवारीला होणाऱ्या श्रीराम मंदिराच्या उदघाटन निम्मित आयोध्यतून आलेल्या मंगल अक्षता भारतीय जनता पार्टीचे १० हजार कार्यकर्ते * रामसेवक* बनून २ लाख घरात या सोहळ्याचे आमंत्रण देणार आहेत .
भारतीय जनता पार्टी पुणे शहराच्या वतीने आज याबाबत महाबैठकीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी बोलताना घाटे म्हणाले ‘ अयोध्येत श्री रामाचे मंदिर व्हावे ही प्रत्येक हिंदूंच्या मनातील भावना आज खऱ्या अर्थाने पूर्ण होत आहे या निम्मित भारतीय जनता पार्टी पुणे शहर संपूर्ण ताकदीने नियोजन करत आहे मतदारसंघ निहाय आढावा बैठका घेऊन १ ते १५ जानेवारी निम्मित होणाऱ्या सर्व कार्यक्रम दिमाखदार पद्धतीने होणार आहेत’
या बैठकीला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे महानगर कार्यवाह सचीन भोसले, सहकार्यवाह महेश पोहोनेरकर , धनंजय काळे , प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ , पुणे शहर प्रभारी माधव भांडारी, प्रदेश उपाध्यक्ष राजेश पांडे ,प्रवक्ते संदीप खर्डेकर, प्रदेश सचिव वर्ष डहाळे,पुणे लोकसभा प्रभारी श्रीनाथ भिमाले ,हेमंत रासने, सरचिटणीस पुनीत जोशी , रवींद्र साळेगावकर , राजेंद्र शिळीमकर, राहुल भांडारे, वर्षा तापकीर , सुभाष जंगले यांच्या सह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading