Thursday, September 3, 2026
Latest NewsSports

आझम स्पोर्ट्स अकादमीला विजेतेपद

पुणे : आझम स्पोर्ट्स अकादमी संघाने वॉरीयर्स संघाला ४ गडी राखून पराभूत करताना आबेदा इनामदार निमंत्रित महिला टी -२० क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.

आझम स्पोर्ट्स अकादमीच्या मैदानावर झालेल्या आजच्या लढतीत वॉरीयर्स संघाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकांत ५ बाद १३० धावा केल्या. श्रद्धा गिरमेने दमदार फलंदाजी करताना ५३ (४९ चेंडू, ९ चौकार) धावांची खेळी केली. तिला तेजस पोळने १९ (२२ चेंडू, ३ चौकार), प्रणया पोहेकर १९ (१४ चेंडू, २ चौकार) व अदिती वाघमारे १६ (१९ चेंडू, २ चौकार) धावा करताना सुरेख साथ दिली. सायली लोणकरने २ तर किरण नवगिरेने १ गडी बाद केला.

आझम स्पोर्ट्स अकादमी संघाने निर्धारित २० षटकांत ६ बाद १३१ धावा करताना विजय साकारला. ऋतुजा गिलबिले ४९ धावा (३६ चेंडू, ६ चौकार) करताना संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. तिला आयेशा शेख ३३ (२७ चेंडू, २ चौकार, १ षटकार), संजना शिंदेने १४ (१९ चेंडू, १ चौकार) धावा करताना सुरेख साथ दिली. मधुरा इंगवलेने ३, ज्ञानेश्वरी पाटीलने २ तर अदिती वाघमारेने १ गडी बाद केला.

स्पर्धेचे बक्षीस वितरण महाराष्ट्र कॉसमॉपोलीटन एज्युकेशन सोसायटीच्या उपाध्यक्षा आबेदा इनामादार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सोसायटीचे सचिव इरफान शेख, आझम स्पोर्ट्स अकादमीचे संचालक डॉ. गुलजार शेख, मजीद सय्यद आदी मान्यवर उपस्थित होते.

किरण नवगिरेच्या सर्वाधिक धावा तर बळींमध्ये ज्ञानेश्वरी पाटील अव्वल

स्पर्धेत आझम स्पोर्ट्स अकादमीच्या किरण नवगिरेने ५ डावात २३० धावा केल्या. यामध्ये १७० धावांच्या धडाकेबाज खेळीचा समावेश आहे. वॉरीयर्स संघाच्या ज्ञानेश्वरी पाटीलने स्पर्धेतील ५ डावात ९ गडी बाद केले. एकून ११ लढतीमध्ये फलंदाजांनी २४६२ धावा केल्या. गोलंदाजानी १०६ गडी बाद केले. या स्पर्धेत एकून २८४ चौकार तर केवळ १५ षटकार मारण्यात आले.

धावफलक :  

वॉरीयर्स : २० षटकांत ५ बाद १३० : श्रद्धा गिरमे ५३ (४९ चेंडू, ९ चौकार), तेजस पोळ १९ (२२ चेंडू, ३ चौकार), प्रणया पोहेकर १९ (१४ चेंडू, २ चौकार), अदिती वाघमारे १६ (१९ चेंडू, २ चौकार), सायली लोणकर ४-०-१७-२, किरण नवगिरे ४-०-३२-२ पराभूत विरुद्ध आझम स्पोर्ट्स अकादमी : २० षटकांत ६ बाद १३१ : ऋतुजा गिलबिले ४९ (३६ चेंडू, ६ चौकार), आयेशा शेख ३३ (२७ चेंडू, २ चौकार, १ षटकार), संजना शिंदे १४ (१९ चेंडू, १ चौकार), मधुरा इंगवले ४-०-२२-३, ज्ञानेश्वरी पाटील ४-०-१९-२, अदिती वाघमारे ४-०-२७-१.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading