Wednesday, June 10, 2026
Latest NewsMAHARASHTRA

मराठी साहित्य संमेलन प्रतिनिधी नोंदणी, ग्रंथदालन नोंदणीस सुरुवात

साने गुरुजी साहित्य नगरी, अमळनेर (जि.जळगाव) | अमळनेर येथे होणाऱ्या ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी प्रतिनिधी नोंदणी, ग्रंथदालन नोंदणी, बालमेळावा नोंदणी, कवीकट्टा नोंदणी, गझलकट्टा नोंदणी, टेंडर प्रक्रिया आदी प्रकारच्या नोंदणीची प्रक्रिया सुरु झाली आहे. ही प्रक्रिया ऑनलाईन व ऑफलाईन अशा दोन्ही प्रकारे करता येणार आहे. माहिती https://marathisahityasammelan.org/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे, अशी माहिती म.वा.मंडळाचे अध्यक्ष डॉ.अविनाश जोशी यांनी दिली आहे.

 

मराठी साहित्य संमेलनासाठी केवळ महाराष्ट्रातूनच नव्हे तर देशभरातील साहित्यिक, लेखक, साहित्यप्रेमी हजेरी लावतात. बाहेर गावावरुन येणाऱ्यांसाठी निवास व भोजन व्यवस्थेकरिता प्रतिनिधी नोंदणी करणे आवश्यक आहे. ही नोंदणी ऑनलाईन व ऑफलाईन पध्दतीने करता येणार आहे. तसेच ज्या लेखक, प्रकाशक व विक्रेत्यांना ग्रंथदालन हवे असल्यास त्यांनीही ग्रंथदालन नोंदणी करणे आवश्यक आहे. ग्रंथदालनांची संख्या मर्यादित असल्याने इच्छिुकांनी ग्रंथदालन आरक्षित करावे. प्रतिनिधी नोंदणी, ग्रंथदालन नोंदणी, बालमेळावा नोंदणी, कवीकट्टा नोंदणी, गझलकट्टा नोंदणी, टेंडर प्रक्रिया आदी माहितीसाठी https://marathisahityasammelan.org/ या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन म.वा.मंडळातर्फे करण्यात आले आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading