Wednesday, June 17, 2026
Latest NewsPUNE

समीक्षा संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ.रमेश वरखेडे यांची निवड

महाराष्ट्र साहित्य परिषदेचे समीक्षा संमेलन १०डिसेंबर रोजी चाळीसगावला

पुणे: महाराष्ट्र साहित्य परिषदेचे एक दिवसीय समीक्षा संमेलन १० डिसेंबर रोजी चाळीसगाव येथे होणार असून अध्यक्षपदी ज्येष्ठ लेखक, संपादक आणि समीक्षक डॉ रमेश वरखेडे यांची निवड करण्यात आली आहे अशी माहिती महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा मिलिंद जोशी यांनी दिली.

प्रा जोशी म्हणाले,परिषदेच्या चाळीसगाव शाखेने या संमेलनाचे आयोजन केले असून त्याचे उद्घाटन महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचे अध्यक्ष व माजी संमेलनाध्यक्ष डॉ सदानंद मोरे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी स्वागताध्यक्ष विनायक चव्हाण,आमदार सत्यजित तांबे, डॉ अविनाश जोशी,परिषदेच्या कोषाध्यक्ष सुनिताराजे पवार, जळगाव जिल्हा प्रतिनिधी तानसेन जगताप,निमंत्रक शिरीष चिटणीस, सह निमंत्रक राजन लाखे उपस्थित राहणार आहेत. या संमेलनात मराठी समीक्षा वाचकस्नेही का नाही या विषयावर माजी संमेलनाध्यक्ष भारत सासणे यांच्या अध्यक्षतेखाली परिसंवाद होणार असून त्यात डॉ रणधीर शिंदे, डॉ देवानंद सोनटक्के, डॉ एकनाथ पगार सहभागी होणार आहेत. डॉ मिलिंद बिल्दीकर आणि आर. सी. पाटील यांच्या उपस्थितीत संमेलनाचा समारोप होणार आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य सम्मेलनाच्या उत्सवी वातावरणात गंभीरपणे साहित्य चर्चा होत नाही अशी अनेक जाणकारांची खंत होती. ती लक्षात घेऊन साहित्य परिषदेने २०११पासून समीक्षा संमेलन सुरु केले. आजवर प्रा रा. ग. जाधव, डॉ सुधीर रसाळ, डॉ दिलीप धोंडगे, डॉ नागनाथ कोत्तापल्ले, डॉ हरिश्चंद्र थोरात, रेखा इनामदार साने अशा  मान्यवरांनी समीक्षा संमेलनाचे अध्यक्षपद भूषविले आहे

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading