Wednesday, June 17, 2026
BusinessLatest News

डोम्स इंडस्ट्रीज लिमिटेडचा आयपीओ बुधवार, 13 डिसेंबर रोजी खुला होणार

मुंबई :  डोम्स इंडस्ट्रीज लिमिटेडने आपला आयपीओ बुधवार, 13 डिसेंबर, 2023 रोजी खुला करण्याचे ठरवले आहे. बोली/ऑफर शुक्रवार 15 डिसेंबर 2023 रोजी बंद होईल. अँकर गुंतवणूकदारांना बोली ऑफर खुली होण्याच्या एक कामकाजाचा दिवस आधी म्हणजे मंगळवार, 12 डिसेंबर, 2023 रोजी बोली लावता येईल.

ऑफरसाठी प्राईस बँड डोम्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या प्रत्येकी 10 रुपये दर्शनी मूल्य असलेल्या प्रत्येक इक्विटी समभागासाठी 750 ते 790 रुपयांदरम्यान निश्चित करण्यात आला आहे. कमीत कमी 18 आणि त्यापेक्षा जास्त हवे असल्यास 18 च्या पटीत इक्विटी समभागांसाठी बोली लावता येईल.

या ऑफरमध्ये 3500 मिलियन रुपयांपर्यंत नव्याने जारी करण्यात आलेल्या इक्विटी समभागांचा (फ्रेश इश्यू) आणि 8500 मिलियन रुपयांपर्यंत विक्रीसाठी सादर करण्यात आलेल्या इक्विटी शेयर्सचा समावेश असणार आहे. विक्रीसाठी प्रस्तुत करण्यात आलेल्या इक्विटी समभागांमध्ये 8000 मिलियन रुपयांपर्यंत फॅब्रिका इटालियाना लॅपीस एड अफिनी एस पी ए कडून, 250 मिलियन रुपयांपर्यंत संजय मनसुखलाल रजनी यांच्याकडून आणि केतन मनसुखलाल रजनी यांच्याकडून 250 मिलियन रुपयांपर्यंत इक्विटी समभागांचा समावेश आहे. या ऑफरमध्ये 50 मिलियन रुपयांपर्यंत इक्विटी समभाग हे पात्र कर्मचाऱ्यांकडून सबस्क्रिप्शनसाठी राखून ठेवण्यात आले आहेत. बुक रनिंग लीड मॅनेजर्सच्या सल्ल्यानुसार ही कंपनी कर्मचारी राखीव भागांतर्गत बोली लावणाऱ्या पात्र कर्मचाऱ्यांना ऑफर किमतीमध्ये प्रति इक्विटी शेयर 75 रुपये डिस्काउंट देईल. कर्मचारी राखीव भाग वगळून उर्वरित ऑफर ही नेट ऑफर आहे.

फ्रेश इश्यू समभागांमधून उभारल्या जाणाऱ्या रकमेचा उपयोग भारतात गुजरातमध्ये जिल्हा वलसाड, तालुका उंबरगाव, गाव देहरी येथे सर्व्हे नंबर 153, 154, 155/2, 159, 160, 161, 164, 165, 166, 168, 170, 172, 175, 180, 181, 370 आणि 391/पी1 येथे विविध प्रकारचे लेखन साहित्य, वॉटर कलर पेन, मार्कर्स आणि हायलायटर्ससाठी उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी नवीन उत्पादन सुविधा स्थापित करण्यासाठी केला जाईल.

ही ऑफर सिक्युरिटीज काँट्रॅक्टस (नियंत्रण) अधिनियम, 1957 च्या नियम 19 (2) (बी) अनुसार,  संशोधित (“एससीआरआर”), सिक्युरिटीज एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) (भांडवल व प्रकटीकरण आवश्यकता जारी करणे) नियम 31 नुसार (“सेबी आयसीडीआर रेग्युलेशन्स”) सेबी आयसीडीआर नियम 6(2) ला अनुसरून बुक बिल्डिंग प्रक्रियेमार्फत देण्यात येत आहे आणि या ऑफरमधील कमीत कमी 75% भाग क्वालिफाईड इन्स्टिट्यूशनल बायर्सना (“क्यूआयबी”) (“क्यूआयबी पोर्शन”) प्रमाणित आधारावर विभागून दिले जातील.  यासाठीची लागू असलेल्या अटीनुसार कंपनी आणि विक्रेते शेयरहोल्डर्स बुक रनिंग लीड मॅनेजर्सच्या सल्ल्याने क्यूआयबी भागांपैकी 60% पर्यंत भाग अँकर गुंतवणूकदारांना विवेकानुसार आधारावर वाटून देतील. अँकर इन्व्हेस्टर पोर्शनपैकी कमीत कमी एक तृतीयांश भाग देशांतर्गत म्युच्युअल फंड्ससाठी राखून ठेवला जाईल, यासाठी सेबी आयसीडीआर नियमांप्रमाणे अँकर इन्व्हेस्टर पोर्शनच्या वर वैध बोली देशांतर्गत म्युच्युअल फंड्सकडून प्राप्त होणे आवश्यक आहे. अंडर-सब्स्क्रिप्शन किंवा अँकर इन्व्हेस्टर पोर्शनमध्ये वाटप न झाल्यास उरलेले इक्विटी शेयर्स उर्वरित क्यूआयबी पोर्शनमध्ये वळते केले जातील. नेट क्यूआयबी पोर्शनपैकी 5% हे प्रपोर्शनेट बेसिसवर फक्त म्युच्युअल फंड्ससाठी उपलब्ध करवून दिले जातील आणि उरलेला नेट क्यूआयबी पोर्शन हे सर्व क्यूआयबी बोली लावणाऱ्यांसाठी (अँकर गुंतवणूकदारांव्यतिरिक्त) प्रपोर्शनेट बेसिसवर उपलब्ध करवून दिले जातील आणि यामध्ये म्युच्युअल फंड्सचा देखील समावेश असेल. यासाठी इश्यू किमतीइतके किंवा त्यापेक्षा जास्त वैध बोली येणे आवश्यक आहे. पण जर म्युच्युअल फंडांकडून आलेली एकूण मागणी ही नेट क्यूआयबी पोर्शनच्या 5% पेक्षा कमी असेल तर म्युच्युअल फंड पोर्शनमध्ये वाटपासाठी उपलब्ध असलेल्यांपैकी उरलेले इक्विटी समभाग क्यूआयबीना (अँकर गुंतवणूकदारांव्यतिरिक्त) प्रपोर्शनेट वाटपासाठी उर्वरित नेट क्यूआयबी पोर्शनमध्ये वळते केले जातील, यामध्ये म्युच्युअल फंडांचाही समावेश असेल, पण त्यासाठी ऑफर किमतीइतक्या किंवा त्यापेक्षा जास्त बोली येणे आवश्यक आहे. नेट ऑफरचा कमीत कमी 15% भाग नॉन-इन्स्टिट्यूशनल खरेदीदारांना सेबी आयसीडीआर नियमांनुसार, प्रपोर्शनेट बेसिसवर वाटपासाठी पुढीलप्रमाणे उपलब्ध करवून दिला जाईल: (अ) नॉन-इन्स्टिट्यूशनल गुंतवणूकदारांसाठी उपलब्ध असलेल्या भागांपैकी एक-तृतीयांश भाग 2,००,००० रुपयांपेक्षा जास्त आणि 1०,००,००० रुपयांपर्यंत  ऍप्लिकेशन आकार असलेल्या अर्जदारांसाठी राखून ठेवला जाईल (ब) नॉन-इन्स्टिट्यूशनल गुंतवणूकदारांसाठी उपलब्ध असलेल्या भागांपैकी दोन-तृतीयांश भाग 1०,००,००० रुपयांपेक्षा जास्त ऍप्लिकेशन आकार असलेल्या अर्जदारांसाठी राखून ठेवला जाईल, यासाठी अशाप्रकारच्या कोणत्याही उप-विभागांमध्ये सबस्क्राईब न करण्यात आलेला भाग नॉन-इन्स्टिट्यूशनल गुंतवणूकदारांच्या दुसऱ्या उप-विभागात वाटून दिला जाईल, यासाठी ऑफर किमतीइतक्या किंवा त्यापेक्षा जास्त पात्र बोली येणे आवश्यक आहे आणि सेबी आयसीडीआर रेग्युलेशन्सनुसार कमीत कमी 10% नेट ऑफर रिटेल इंडिविज्युअल बिडर्सना वाटून देण्यासाठी उपलब्ध राहील, यासाठी ऑफर प्राईसइतक्या किंवा त्यापेक्षा जास्त किमतीच्या पात्र बोली येणे आवश्यक आहे. सर्व संभाव्य बिडर्स बोली लावणारे सर्व (अँकर इन्वेस्टर्सव्यतिरिक्त) अप्लिकेशन सपोर्टेड बाय ब्लॉक्ड अमाऊंट (“एएसबीए”) प्रक्रियेमार्फत या इश्यूमध्ये सहभागी होतील यासाठी त्यांना त्यांच्या खात्यांची (युपीआय यंत्रणा वापरणाऱ्या बिडर्ससाठी युपीआय आयडी) माहिती देणे आवश्यक आहे ज्यामध्ये जे सेल्फ सर्टिफाईड सिंडिकेट बँकांकडून (“एससीएसबी”) किंवा प्रायोजक बँकेकडून (जे लागू असेल त्याप्रमाणे) युपीआय यंत्रणेअंतर्गत संबंधित बोली रकमा ब्लॉक केल्या जातील. अँकर इन्वेस्टर्सना एएसबीए प्रक्रियेमध्ये सहभागी होण्याची परवानगी नाही.

दिनांक 2 डिसेंबर, 2023 रोजीच्या रेड हेरिंग प्रॉस्पेक्टसमार्फत प्रस्तुत करण्यात आलेले इक्विटी समभाग बीएसई लिमिटेड (“बीएसई”) आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया लिमिटेडमध्ये सूचिबद्ध करण्यासाठी प्रस्तावित आहेत. (“एनएसई” बीएसई व एनएसई यांना एकत्रितपणे स्टॉक एक्सचेंजेस असे संबोधण्यात आले आहे)

जेएम फायनान्शियल लिमिटेड, बीएनपी परिबास, आयसीआयसीआय सिक्युरिटीज लिमिटेड आणि आयआयएफएल सिक्युरिटीज लिमिटेड हे या ऑफरचे बुक रनिंग लीड मॅनेजर्स आहेत.

ज्यांच्यासाठी विनंती अर्ज करण्यात आले आहेत अशा मंजुरी, बाजारपेठेतील स्थिती आणि इतर सर्व बाबी यांच्या आधीन राहून डोम्स इंडस्ट्रीज लिमिटेड आपल्या इक्विटी समभागांचा आयपीओ आणण्याचा प्रस्ताव करत असून त्यासाठी आरओसीकडे दिनांक 2 डिसेंबर, 2023 रोजी आरएचपी दाखल करण्यात आले आहे. सेबीची वेबसाईट www.sebi.gov.in, बीएसई आणि एनएसई यांच्या वेबसाईट अनुक्रमे www.bseindia.com आणि www.nseindia.com वर, कंपनीची वेबसाईट www.domsindia.com वर आणि बुक रनिंग लीड मॅनेजर्सच्या वेबसाईट – जेएम फायनान्शियल लिमिटेड, बीएनपी परिबास, आयसीआयसीआय सिक्युरिटीज लिमिटेड आणि आयआयएफएल सिक्युरिटीज लिमिटेड अनुक्रमे www.jmfl.comwww.bnpparibas.co.inwww.icicisecurities.com आणि  www.iiflcap.com वर उपलब्ध आहे. सर्व संभाव्य गुंतवणूकदारांनी हे लक्षात घ्यावे की इक्विटी शेअर्समधील गुंतवणुकीत उच्च प्रमाणात जोखीम असते आणि अशा जोखमीशी संबंधित तपशीलांसाठी, कृपया आरएचपीच्या पान क्रमांक 32 वरील ‘रिस्क फॅक्टर्स’ शीर्षकाचा विभाग पहा. संभाव्य गुंतवणूकदारांनी कोणताही गुंतवणूक निर्णय घेण्यासाठी सेबीकडे दाखल केलेल्या ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टसवर अवलंबून राहू नये आणि त्याऐवजी आरएचपीवर अवलंबून राहावे. इक्विटी शेअर्स 1933 च्या यूएस सिक्युरिटीज अॅक्ट (“यूएस सिक्युरिटीज अॅक्ट”) किंवा युनायटेड स्टेट्समधील कोणत्याही राज्य सिक्युरिटीज कायद्यांतर्गत नोंदणीकृत केलेले नाहीत आणि केले जाणार नाहीत, आणि तसे नोंदणीकृत केल्याशिवाय, युनायटेड स्टेट्समध्ये ऑफर किंवा विक्री केले जाऊ शकत नाहीत. युनायटेड स्टेट्स, यूएस सिक्युरिटीज अॅक्ट आणि लागू यूएस राज्य सिक्युरिटीज कायद्यांच्या नोंदणी आवश्यकतांच्या अधीन नसलेल्या व्यवहारातून सूट देण्यात आलेली असल्यास तो याला अपवाद राहील. त्यानुसार, रेग्युलेशन एस मध्ये नमूद करण्यात आल्यावर आणि प्रत्येक अधिकारक्षेत्रातील लागू कायद्यांनुसार इक्विटी शेअर्स युनायटेड स्टेट्सच्या बाहेर ऑफशोअर व्यवहारांमध्ये ऑफर केले जात आहेत आणि विकले जात आहेत. युनायटेड स्टेट्समध्ये इक्विटी शेअर्सचे कोणतेही पब्लिक ऑफरिंग होणार नाही.

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading